शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कपडे काढा आणि समोरच्याला किस करा, रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमधला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:16 IST

तुझे किती लवर्स आहेत? तुला सेक्सबद्दल माहीत आहे का? तू कधी सेक्स केलयंस का? तुझ्यासमोर उभ्या असलेल्या तरूणाला किस कर... उत्तरं द्यायला संकोच वाटेल अशा अनेक अश्लिल प्रश्नांची सरबत्ती...

बंगळुरू : एका रिअॅलिटी शोच्या ऑडिशनदरम्यान कंटेस्टंट्ससोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बंगळुरूमध्य़े ही घटना घडली आहे. स्टार स्वर्णा चॅनलवर लवकरच सुरू होणारा रिअॅलटी शो ‘प्याते हुदुगिर हाली लाइफ’ सीझन 4 साठी ऑडिशन महारानी लक्ष्मी अमानी कॉलेजमध्ये ठेवण्यात आले होते. या कॉलेजच्या अनेक तरुणींनी या ऑडिशनला हजेरी लावली होती. परंतू त्यांच्यासोबत येथे गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक तरूणींनी केला आहे. या ऑडिशनदरम्यान तरूणींना उत्तरं द्यायला संकोच वाटेल अशा अनेक अश्लिल प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, सेक्ससंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आले. तसंच ज्या तरूणी छोटे कपडे घालून आल्या होत्या त्यांना वेगळ्या रांगेत उभं करण्यात आलं. तुझे किती लवर्स आहेत? तुला सेक्सबद्दल माहीत आहे का? तू कधी सेक्स केलयंस का? तुझ्यासमोर उभ्या असलेल्या तरूणाला किस कर असंही सांगण्यात आलं, अशाप्रकारचे एकाहून एक गंभीर आरोप तरूणींनी केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. या प्रकाराचा तरूणींनी विरोध करण्यास सुरूवात केली, अनेक तरुणींचे पालक त्या ठिकाणी पोहोचले. वाढता विरोध पाहून अखेर घटनास्थळी पोलीस आले आणि ऑडिशन थांबवण्यात आलं.  दुसरीकडे,  तरूणींनी केलेले आरोप निराधार आहेत, आम्ही असे प्रश्न विचारत नाहीत. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते असा आरोप करत आहेत. ऑडिशनदरम्यान काही तरूणी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत असं म्हणतात, त्यांची परीक्षा घेण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात असं स्पष्टीकरण ऑडीशनच्या आयोजकांकडून देण्यात आलं आहे.