शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, चेंगराचेंगरीप्रकरणी घोषणाबाजी व तोडफोड, आठ जण ताब्‍यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:27 IST

Pushpa 2 stampede row : पोलिसांनी तत्‍काळ हस्तक्षेप करत उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या आठ सदस्यांना ताब्यात घेतले

Pushpa 2 stampede row :  दाक्षिणात्‍य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घरावर रविवारी (दि.२२) उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक आणि टोमॅटो फेकले. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी अल्‍लू अर्जुनच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्‍यांनी संध्या थिएटरमध्‍ये झालेल्‍या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी घरावर दगडफेक आणि टोमॅटो फेकले.

यावेळी पोलिसांनी तत्‍काळ हस्तक्षेप करत उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या आठ सदस्यांना ताब्यात घेतले आणि त्‍यांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्‍यान, अल्‍लू अर्जुनच्‍या घरात तोडफोडीचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्‍ये काही जण घराच्‍या कंपाऊंडमधील कुंड्या फोडल्‍याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता, असे सांगण्यात येत आहे. 

'पुष्पा २' च्या प्रीमियरच्यावेळी झाली होती चेंगराचेंगरी ४ डिसेंबर २०२४ रोजी 'पुष्पा २' च्या प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये गेला होता, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. या अपघातात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा ९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. तो अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन, थिएटर आणि सुरक्षा एजन्सीविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्‍लू अर्जुनला झाली होती अटकचेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अटक केली होती. अटकेनंतर त्याला ४ वाजता स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्लूने अंतरिम जामिनासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात अपील केले होते. सायंकाळी ५ वाजता त्याला ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. यादरम्यान, त्याने एक रात्र कारागृहात काढली होती.

टॅग्स :Allu Arjunअल्लू अर्जुनPushpaपुष्पा