शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

भाजपाला जबर धक्का ?

By admin | Updated: June 11, 2016 06:33 IST

विविध पक्षांत बंडखोरी घडवून आणण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याचे संकेत असून, आज ११ जून रोजी मतदान आणि निकाल घोषित होणार

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत पाच राज्यांमध्ये पाच जागांवर अपक्षांना पाठिंबा देत विविध पक्षांत बंडखोरी घडवून आणण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याचे संकेत असून, आज ११ जून रोजी मतदान आणि निकाल घोषित होणार आहे.हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड या पाच राज्यांमध्ये अपक्षांना भाजपाने पाठिंबा जाहीर केला असले तरी हे उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी आहे. या राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा हादरा देण्यासाठी बहुतांश विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकले आहे. आश्चर्य म्हणजे हरियाणात आयएनएलडी आणि काँग्रेस या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी हातमिळवणी केल्यामुळे वकील आर. के. आनंद यांचा विजय सुलभ होणार आहे. परिणामी भाजपाचा पाठिंबा असलेले माध्यमसम्राट सुभाष चंद्रा यांच्यापुढे संकट आहे. उत्तर प्रदेशात कपिल सिब्बल, मध्य प्रदेशात विवेक तनखा, उत्तराखंडमध्ये प्रदीप ताम्टा या काँग्रेस उमेदवारांना बसपा आणि अन्य छोट्या पक्षांनी समर्थन जाहीर केले आहे. या तीन (पान ७ वर)भाजपला जबर धक्का ?(पान १ वरून) राज्यांमध्ये अपक्षांना निवडून आणण्याची भाजपला फारच कमी संधी आहे. उत्तर प्रदेशात भाजपने प्रीती महापात्रा, मध्य प्रदेशात विनोद गोटिया आणि उत्तराखंडमध्ये गीता ठाकूर यांना पाठिंबा जाहीर करीत चुरस वाढविली आहे. जातीयवादी शक्तींविरुद्ध लढा असल्याचे सांगत मायावतींनी भाजपला पराभूत करण्याचे संकेत दिले आहेत. झारखंडमध्ये झामुमोचे उमेदवार बसंत सोरेन यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भाजपची अडचण वाढली आहे. दुसरी जागा जिंकण्यासाठी सोरेन यांना सहा मते कमी पडत आहेत. पहिल्या जागी भाजपचे मुख्तार अब्बास नकवी यांचा विजय मात्र निश्चित मानला जातो. पण भाजपच्या महेश पोद्दार यांचा विजयही अवघड ठरेल. राजस्थानमध्ये सर्व चारही जागा भाजपच्या झोळीत पडतील, कारण या पक्षाला १६४ पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन लाभले आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस समर्थित कमल मोरारका यांची जागा धोक्यात आहे. कर्नाटकची राज्यसभा निवडणूक रद्द करण्याची भाजपने केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जद(एस)चे बी.एम. फारूक विजयी होतील, असे मानले जाते. >२६ जागांचा निकालसात राज्यांमधील राज्यसभेच्या २६ जागांचा निकाल आज मतदानानंतर जाहीर होईल. नऊ राज्यांमधील ३२ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पूर्णत्वास जाईल. सात केंद्रीय मंत्री राज्यसभेवर निवडून जात आहेत.