शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:13 IST

Jagannath Puri Rath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

जगन्नाथाच्या रथाला स्पर्श करण्यासाठी भाविकांनी पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ केलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १० जण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी पहाटे ४.०० ते ५.०० वाजताच्या सुमारास घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथाच्या रथाला स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली. परिणामी, नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि ढकलाढकली झाली. त्यावेळी नंदीघोष रथाच्या चाकाजवळ अनेक भाविक एकमेकांच्या अंगावर पडले. या घटनेत तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तर, १० हून अधिक जण जखमी झाले.

 घटनास्थळी कोणतीही रुग्णवाहिका नसल्याने जखमींना उचलून रुग्णालयात नेण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बसंती साहू, प्रेमकांती मोहंती आणि प्रभात दास अशी मृतांची नावे आहेत.

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राOdishaओदिशा