शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

पंजाबच्या राजकारणाचा झाला वृद्धाश्रम; नेत्यांचे ‘कुटुंब कल्याण’ जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 09:03 IST

आपल्याकडे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख दहावेळा आमदारकी जिंकले. बादलही तसेच दहावेळा जिंकलेले असून, आता हलका लंबी मतदारसंघातून अकराव्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. ते  पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात मंत्रीदेखील होते.

यदु जोशी

जालंधर : पंजाबच्या निवडणुकीत ९४ वर्षांचे दिग्गज अकाली दल नेते प्रकाश सिंग बादल यांच्यासह वयाची ऐंशी पार केलेले अनेक नेते रिंगणात उतरले आहेत. पंजाबच्याराजकारणाचा हा वृद्धाश्रम चर्चेचा विषय असून, घराणेशाहीची उदाहरणे जागोजागी दिसतात. नेत्यांचे ‘कुटुंब कल्याण’ जोरात आहे.आपल्याकडे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख दहावेळा आमदारकी जिंकले. बादलही तसेच दहावेळा जिंकलेले असून, आता हलका लंबी मतदारसंघातून अकराव्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. ते  पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात मंत्रीदेखील होते. त्यांचे ६० वर्षीय पुत्र आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल हे जलालाबादमधून भाग्य अजमावताहेत. सुखबीर सिंग यांच्या पत्नी हरसिमरत कौर या भटिंडाच्या विद्यमान खासदार आहेत. स्वत:चा पक्ष स्थापन करून पटियाला शहरमधून लढत असलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परनीत कौर या पटियालाच्या खासदार आहेत. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार  प्रेम सिंग चंदुमांजरा वयाच्या ७२व्या वर्षी घनौरमधून दंड थोपटून आहेत, तर त्यांचे पुत्र हरिंदरपाल सिंग हे  सनौरमध्ये मैदानात आहेत. वादग्रस्त नेते विक्रम सिंग मजिठिया हे अमृतसर पूर्वमधून, तर त्यांची पत्नी गनीव कौर या मजिठियातून लढताहेत. 

अजूनही यौवनात मी...९४ वर्षांचे प्रकाश सिंग बादल, ८० वर्षांचे कॅप्टन अमरिंदरसिंग पुन्हा निवडणूक आखाड्यात दंड थोपटून उभे आहेत. माजी मंत्री ८५ वर्षीय सुखदेवसिंग ढिंढसा यांनी स्वत:च्या पक्षाचे १५ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. रणजित सिंग ब्रह्मपुरा ८४, तोता सिंग ८१, जनमेजा सिंग सेखो ७७, काँग्रेसचे तृप्त रजिंदर बाजवा ७८, राजिंदर कौर भट्टल ७६, माजी मंत्री आणि आपचे उमेदवार जोगिंदर सिंग मान ७५, हे नेते अजून यौवनात मी म्हणत विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत.

- मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले चरणजित सिंग चन्नी हे भदोड आणि श्री चमकोर साहिब या दोन मतदारसंघांमधून लढताहेत; पण त्यांचे बंधू डॉ. मनोहर सिंग हे बस्सी पठाणातून अपक्ष लढत आहेत. काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकविले.  - प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रताप सिंग बाजवा हे कादियामधून काँग्रेसचे, तर त्यांचे लहान बंधू फतेहजंग सिंग हे बटालामधून भाजपचे उमेदवार आहेत. - माजी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांचे पुत्र मनीष (काँग्रेस) बरनालामधून, अकाली दलाचे राज्यसभा सदस्य बलविंदर सिंग भुंदड यांचे पुत्र आ. दिलराज सिंग सरदुलगडमधून, ‘आप’चे नेते माजी खासदार साधू सिंग यांची कन्या बलजित कौर मलोटमधून, फतेहगड साहिबचे काँग्रेस खासदार अमर सिंग पुत्र कामिल अमर सिंग (काँग्रेस) रायकोटमधून, अशी नातेवाइकांची मांदियाळी पंजाब निवडणुकीत दिसत आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२PunjabपंजाबPoliticsराजकारणElectionनिवडणूक