शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

पंजाबमध्ये ६८ टक्के,  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 05:35 IST

अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद

नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी काही तुरळक प्रसंग वगळता रविवारी शांततेने मतदान पार पडले. पंजाबमध्ये ६८ टक्के व उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अशा अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे.

पंजाबमध्ये निवडणूक रिंगणात १३०४ उमेदवार होते. या राज्यात अंतर्गत वादांमुळे त्रासलेल्या काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आप, शिरोमणी अकाली दल, भाजप, पंजाब लोक काँग्रेस आदी पक्षांनी कंबर कसली होती. पंजाब, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी जाहीर होईल. उत्तर प्रदेशमध्ये आता ७ मार्चपर्यंत विधानसभा निवडणुकीचे आणखी चार टप्पे पार पडणार आहेत.

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी सुमारे ६० टक्के मतदान झाले. सपचे प्रमुख अखिलेश यादव लढत असलेल्या करहाल मतदारसंघातील घडामोडींकडे रविवारी सर्वांचे लक्ष लागले होते. 
  • झाशी येथील बबीना विधानसभा मतदारसंघातील सिमथरी गावात सप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली. त्यात काही जण जखमी झाले. असे आणखी एक-दोन प्रकार वगळता उत्तर प्रदेशातील मतदान शांततेत पार पडले.

भाजप-अकाली दलाची निकालानंतर युती?निकालानंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी गरज पडल्यास भाजप आघाडीसोबत शिरोमणी अकाली दल समझोता करू शकतो, असे विधान करुन बिक्रम सिंग मजिठिया यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याचे संकेत दिले. त्यावरून १० मार्चला लागणाऱ्या निवडणूक निकालानंतर राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता दिसते. मजिठिया हे शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते आहेत.

सोनू सूद यांची कार जप्तपंजाबमधील मोगा शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन अभिनेता सोनू सूद मतदारांना प्रभावित करीत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांनी मतदान केंद्रांना भेट देऊ नये, घरातच राहावे असा आदेश निवडणूक आयोगाने त्यांना दिला. पोलिसांनी अभिनेता सोनू सूद यांची कार जप्त करून पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. सूद यांची बहीण मालविका सूद सच्चर या मोगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२