शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘पंजाब नॅशनल बँके’त पुन्हा घोटाळा; सीबीआयकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:31 IST

२०१८ पासून बँकेच्या वतीने सीबीआयकडे तिसरी तक्रार दाखल झाली असून, त्यात आपल्याला सुमारे २ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे बँकेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी केलेल्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. २०१८ पासून बँकेच्या वतीने सीबीआयकडे तिसरी तक्रार दाखल झाली असून, त्यात आपल्याला सुमारे २ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे बँकेने म्हटले आहे.पीएनबीने ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सीबीआयच्या वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. या तक्रारीनुसार, वाहन दुरुस्ती आणि सेवा क्षेत्रातील कंपनी ‘कार्नेशन ऑटो इंडिया प्रा.लि.’चे संस्थापक जगदीश खट्टर यांनी बँकेला ११० कोटी रुपयांना (१५.४ दशलक्ष डॉलर) फसविले आहे. कुकर्जाशी संघर्ष करणाऱ्या पीएनबीने जुलैमधील बनावट व्यवहाराचीही तक्रार केली आहे. ताज्या तक्रारीत बँकेने म्हटले आहे की, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या खट्टर यांनी काही बँकांशी हातमिळवणी करून पंजाब नॅशनल बँकेला फसवले. दरम्यान, खट्टर यांनी फसवणुकीचा आरोप फेटाळून लावला आहे. कार्नेशन कंपनी व्यवसायात अपयशी ठरली आहे. हे शुद्ध व्यावसायिक अपयश आहे. त्यात काहीही चुकीचे घडलेले नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला आघाडीच्या मान्यवर संस्थेकडून विस्तृत न्यायसहायक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात काहीही चुकीचे आढळून आलेले नाही. सीबीआयने छापे मारून चौकशीही केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आमच्या म्हणण्यास दुजोरा मिळेल.पीएनबीच्या तक्रारीनुसार, बँकेने ३० जून २०१२ रोजी कार्नेशनचे खाते कुकर्जाच्या श्रेणीत टाकले होते. दरम्यान, पीएनबीच्या कुकर्जाचे प्रमाण सप्टेंबरमध्ये १६.८ टक्के झाले आहे. जूनमध्ये ते १६.५ टक्के होते.

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँक