शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

केसगळती थांबवण्याच्या नादात अडकले; औषध लावल्यानंतर ६७ लोकांसोबत धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:35 IST

केसगळती थांबवणे पडलं महागात; शिबिरातून लोक पोहोचले रुग्णालयात

Punjab Crime: केस गळण्याच्या त्रासाने अनेकजण त्रस्त असतात. यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समोवश आहे. टक्कल पडण्याने अनेक तरुण नैराश्यात गेल्याचेही अनेक उदाहरणं आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यामुळे डोक्यावरचे केस परत मिळवण्यासाठी लोक काय काय नाही करत.विविध प्रकारचे उपाय करून पाहिल्यानंतर काहीजण डॉक्टरांकडे जातात. अशातच पंजाबमध्येही केसांच्या उपचारांसाठी गेलेल्या काही जणांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. डोक्यावर केस उगवून दाखवणाऱ्या चमत्कारी शिबिरातून काहीजण रुग्णालयात पोहोचले आहेत.

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात केसांवरील उपचाराच्या एका शिबिरात सहभागी झाल्यानंतर काही जणांना डोळ्यांचा संसर्ग झाला. यानंतर सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगरूरमध्ये टक्कल पडल्यामुळे उपचारासाठी आलेल्या शेकडो लोकांना डोळ्यात गंभीर संसर्ग झाला. कालीदेवी मंदिरात आयोजित केलेल्या शिबिरात डोक्याला लावलेल्या औषधाने काही जणांना रिॲक्शन झाली. त्यामुळे ६७ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोशल मीडियावर या शिबिराची जोरदार चर्चा होती. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. मात्र औषध लावल्यानंतर  लोकांच्या डोळ्यांना जळजळ, सूज आणि संसर्गाच्या तक्रारी येऊ झाल्या.

संगरूर येथील कालीदेवी मंदिरात रविवारी केसांवरील उपचाराच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केसगळतीची समस्या दूर करण्याचा दावा या शिबिरात करण्यात आला होता. शिबिरात आलेल्या लोकांना केसांना लावण्यासाठी विशेष प्रकारचे तेल देण्यात आले. पण हे तेल लावल्यानंतर काही वेळातच अनेकांना डोळ्यांची जळजळ आणि इतर तक्रारी सुरू झाल्या. औषध लाल्यानंतर काही वेळाने  डोळ्यात जळजळ होऊ लागली. ती हळूहळू वाढत गेली आणि सूज येऊ लागली. रात्री त्रास आणखी वाढल्याने ६७ जण तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल झाले. यापैकी अनेकांना डोळ्यांना गंभीर संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकारानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केस उपचार शिबिराच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या शिबिराचे आयोजन करणाऱ्या दोघांनी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय किंवा तज्ज्ञांच्या परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित केल्याचे  तपासात समोर आले आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबHair Care Tipsकेसांची काळजी