शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

डेरा सच्चा सौदाच्या राम रहीमनंतर आता राधे माँच्या अडचणीत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 17:13 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना तुरुंगवास भोगावा लागल्यानंतर आता स्वतःला देवीचा अवतार समजणा-या राधे माँच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पंजाब, दि. 5 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांना तुरुंगवास भोगावा लागल्यानंतर आता स्वतःचा देवीचा अवतार सांगणा-या राधे माँच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये एक व्यक्तीनं राधे माँविरोधात पंजाब उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.पंजाबमधल्या फगवाडातील रहिवासी असलेल्या सुरेंद्र मित्तलनं पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्वयंघोषित देवीचा अवतार सांगणा-या राधे माँच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं अपील केलं आहे. या याचिकेवर सुनावणी करत पंजाब उच्च न्यायालयानं कपूरथला पोलिसांना फटकारलं होतं. पंजाब उच्च न्यायालयानं राधे माँ विरोधात अद्यापपर्यंत एफआयआर का दाखल केलं नाही, असा सवाल विचारला आहे. सुरेंद्र मित्तल यांनी काही महिन्यांपूर्वीच राधे माँच्या विरोधात पंजाब पोलिसांत तक्रार दिली होती.राधे माँ त्यांना रात्री-अपरात्री फोन करून त्रास देत असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं. पंजाब पोलिसांना या प्रकरणात 13 नोव्हेंबर रोजी पंजाब उच्च न्यायालयासमोर उत्तर द्यायचं आहे. पोलिसांनी हा गुन्हा आहे की नाही, हेसुद्धा न्यायालयासमोर स्पष्ट करायचं आहे. जर गुन्हा असल्यास अद्यापपर्यंत एफआयआर का दाखल केलं गेलं नाही, याचीही माहितीही द्यावी लागली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राधे माँच्या विरोधात तिचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणा-या मनमोहन गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलांना हाताशी धरुन राधे माँने मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप मनमोहन गुप्ता यांनी केला होता. राजवीन आणि संजीव ही मनमोहन गुप्तांची मुले राधे माँ सोबत आहेत.  गुप्ता यांनी बोरिवली पोलीस स्थानकात राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली होती. मनमोहन गुप्ता यांनीच राधे माँला मुंबईत आणले होते. आपल्या नंदनवन भवन या तीन मजली इमारतीत त्यांनी राधे माँच्या निवासाची व्यवस्था केली होती. राधे माँने दोन वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन केले व माझ्याच मुलांकरवी मला मारहाण करण्याची धमकी दिली होती, असे मनमोहन गुप्ता यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले होते.मागच्या वर्षी मनमोहन गुप्ता यांनी राधे माँ आणि आपल्या दोन मुलांना घराचा ताबा सोडण्यास सांगितले. माझी मुले राधे माँसोबत पंजाबला निघून गेली होती. कलम 507 अंतर्गत एनसी नोंदवण्यात आली असून, आरोपांची पडताळणी केल्यानंतर पोलीस एफआयआर दाखल केलं होतं. मागच्या वर्षी एका महिलेने राधे माँ विरोधात तक्रार केल्यानंतर ती अडचणीत सापडली होती. हुंडयासाठी सासरकडच्या मंडळींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप पीडित महिलेने राधे माँवर केला होता. महिलेच्या सासरकडची मंडळी राधे माँ चे भक्त होते.