शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘या’ राज्यातील सर्व शहरात पुन्हा ‘नाईट लॉकडाऊन’; रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू

By प्रविण मरगळे | Updated: November 25, 2020 16:05 IST

Punjab Coronavirus: तज्ज्ञ, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची आपत्कालीन नियुक्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांना दिले आहेत.

ठळक मुद्देतज्ज्ञ, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची आपत्कालीन नियुक्ती करण्याचे निर्देशऑक्सिजन आणि आयसीयू बेडची उपलब्धता आणखी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आदेश२४९ तज्ञ डॉक्टर आणि ४०७ वैद्यकीय अधिकारी भरती होणार आहेत

नवी दिल्ली – एनसीआरमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती पाहता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यात नवीन निर्बंध लागू केले आहेत, सर्व शहरांत व बाजारपेठांमध्ये पुन्हा रात्रीचा कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत १ डिसेंबरपासून मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन न करणाऱ्यांकडून दुप्पट दंड आकाराणी करण्यात येणार आहे.

पंजाबमधील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न सोहळे रात्री ९.३० वाजता बंद होतील, रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील. पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्यास आता ५०० रुपयांऐवजी १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. १५ डिसेंबर रोजी रात्रीच्या कर्फ्यूचा आढावा घेतला जाईल.

दिल्ली रुग्णांची संख्या लक्षात घेता पंजाब राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यास व अनुकूलित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या मदतीने लाभ मिळावा यासाठी मुख्य सचिव विनी महाजन यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची उपलब्धता आणखी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एल II आणि एल III बळकट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये एल III सुविधा उपलब्ध नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये सतत देखरेखीचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, तज्ज्ञ, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची आपत्कालीन नियुक्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांना दिले आहेत. २४९ तज्ञ डॉक्टर आणि ४०७ वैद्यकीय अधिकारी भरती होणार आहेत. भविष्यात आवश्यक असल्यास एमबीबीएसच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

दिल्लीतील शाळा बंद

कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थितीपाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाब