शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Punjab Election 2022: जाहीरनाम्यांमधील फुकटबाजीमुळे तिजोरी होणार साफ; आश्वासनं देण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 06:50 IST

सत्तारुढ काँग्रेसने तर आश्वासनांची लयलूट केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा धुरी येथे झाली.

यदु जोशी

चंडीगड : पंजाबमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार शर्यत लागली आहे. जाहीरनाम्यांमध्ये ‘फुकट’गिरी ठासून भरली आहेच. त्यापलिकडे जावून फुकटवाल्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाखाली असलेले पंजाब सरकार राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी ही खैरात वाटताना आणखीच कर्जबाजारी होणार आहे. सत्तेची आस लावून बसलेल्या आम आदमी पार्टीने मोफतचा दिल्ली पॅटर्न पंजाबमध्येही आणला. वीज मोफत देणार, १८ वर्षे वयावरील महिलांना महिन्याकाठी एक हजार रुपये देणार, झोपडीधारकांना मोफत पक्की घरे, गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण, १६ हजार मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार असा आश्वासनांना पेटारा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उघडला आहे. 

भाजपने एक लाख एकर शेतजमीन ही भूमिहिनांना मोफत देण्याचे, प्रत्येक भूमिहिनास वर्षाकाठी सहा हजार रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण, पदवीनंतर बेरोजगार राहिलेल्या दोन वर्षापर्यंत चार हजार रुपये महिना भत्ता, सर्वांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज असा आश्वासनांचा गुच्छ मतदारांच्या हाती दिला आहे. अकाली दलाने शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत सायकली, प्रत्येक घरी मोफत वीज असे आश्वासनांचे पॅकेज दिले आहे.

सत्तारुढ काँग्रेसने तर आश्वासनांची लयलूट केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा धुरी येथे झाली. त्यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येक घरी वर्षाकाठी आठ गॅस सिलिंडर मोफत देऊ आणि १८ वर्ष वयावरील प्रत्येक महिलेस ११०० रुपये महिना दिला जाईल असे जाहीर केले. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी खुल्या प्रवर्गातील मुलांसाठीही स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा अजून यायचा आहे.

पंजाबमध्ये बेरोजगारी, माफिया राज आणि नशाखोरी या तीन महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठीचा उपाय कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे स्वस्त लोकप्रियतेसाठी मोफतवाल्या घोषणांना ऊत आला आहे. या अशा घोषणा पंजाबची अर्थव्यवस्था बुडविल्याशिवाय राहणार नाहीत.  - डॉ. रणजित सिंग घुमान, माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख,  पंजाबी विद्यापीठ, पटियाला

काढावे लागणार आणखी कर्ज एकीकडे पंजाब सरकारवर तीन लाख कोटींचे कर्ज आहे आणि दुसरीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सरकारच्या उत्पन्नात कमालीची घटले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारला ओढाताण करावी लागत आहे. विकास कामांना कात्री लावावी लागत आहे. फुकटवाल्या घोषणांपायी राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी तीस हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागेल.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२