शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

देवाच्या आणा-भाकांच्या आधारे देणार निकाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:27 AM

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून व पुरावे तपासून न्यायालये कायद्यानुसार निकाल देतात हे सर्वश्रुत आहे. हल्ली प्रलंबित दावे लवकर निकाली निघावेत यासाठी तंटा निवारणाच्या नव्या पर्यायांना प्रोत्साहन दिले जात आहे.

चंदीगढ : दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून व पुरावे तपासून न्यायालये कायद्यानुसार निकाल देतात हे सर्वश्रुत आहे. हल्ली प्रलंबित दावे लवकर निकाली निघावेत यासाठी तंटा निवारणाच्या नव्या पर्यायांना प्रोत्साहन दिले जात आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी हेच सूत्र पकडून पक्षकाराला देवाच्या आणा-भाका करण्यास सांगून, निर्णय देण्याचे ठरविले आहे.काश्मीर सिंग व नरेंद्र पाल सिंग या दोन नातेवाईकांत एका मालमत्तेच्या व्यवहारावरून वाद आहे. मालमत्तेच्या ४.६० लाख रुपयांपैकी ४.३० लाख रुपये आपण नरेंद्र पाल सिंग यांना दिले आहेत, असा काश्मीर सिंगयांचा दावा आहे. याउलट काश्मीर सिंग यांनी आपल्याला एक छदामही दिलेला नाही व मालमत्ता विक्रीचा त्यांनी बनावट विक्रीकरार बनावट केला, असा नरेंद्र पाल सिंग यांना प्रतिवाद आहे.या संबंधीचे अपील न्या. अजय तिवारी यांच्यापुढे आहे. याआधी न्या. तिवारी यांनी दोन्ही पक्षांच्या विनंतीवरून नाखुशीने सुनावणी तहकूब केली होती. दोन दिवसांपूर्वी अपील पुन्हा सुनावणीस आले, तेव्हा दोन्ही पक्षांनी आपसात सहमतीने तंटा मिटविण्याचे ठरल्याचे सांगितले व त्यानुसार न्यायालयाने प्रकरण निकाली काढावे अशी विनंती केली.दोन्ही पक्षांनी जी सहमती न्यायालयास कळविली त्यानुसार नरेंद्र पाल सिंग यांनी नदा साहेब गुरुद्वारात यायचे व गुरु ग्रंथसाहेबवर हात ठेवून आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे शपथपूर्वक सांगायचे. तसे केले तरच काश्मीर सिंग त्यांचे म्हणणे मान्य करून न्यायालयातील अपील मागे घेतील. नरेंद्र पाल सिंग यांनी शपथ न घेतल्यास ते खोटे बोलत असल्याचे मानून अपील मंजूर केले जाईल व त्यांना पैसे द्यावे लागतील. (वृत्तसंस्था)प्रसंगाचे चित्रीकरण करान्या. तिवारी यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यानुसार समेट होतो का, हे पाहण्याची त्यांना मुभा दिली. त्यासाठी न्यायमूर्तींनी एका वकिलाची ‘कमिशनर’ म्हणून नेमणूक केली.त्यांनी गुरुद्वारामध्ये हजर राहून व समेटानुसार नरेंद्र पाल सिंग शपथ घेतात की नाही ते पाहून, त्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरण करून न्यायालयास अहवाल द्यावा, असे सांगितले. ‘कमिशनर’ नेमलेले वकील जो अहवाल देतील. त्यानुसार, न्या. तिवारी पुढील तारखेला अपिलावर निर्णय देतील.

टॅग्स :Courtन्यायालयPunjabपंजाब