शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्या पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला होता, त्यांना मुख्यमंत्र्यांचा थेट व्हिडीओ कॉल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:24 IST

सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरजित सिंह यांना व्हिडीओ कॉल केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

चंदीगड : पंजाबच्या पटियालामध्ये निहंग शीखांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस अधिकारी हरजित सिंह यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्हिडीओ कॉलवरून चर्चा केली. हरजित सिंह यांच्यावर चंदीगडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. निहंग शीखांच्या हल्ल्यात हरजित सिंह यांचा हात तुटला होता. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी साडे सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हरजित सिंह यांचा हात पुन्हा जोडला आहे. 

सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरजित सिंह यांना व्हिडीओ कॉल केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यासंदर्भात कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट केले आहे. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह म्हटले आहे की, "पोलीस अधिकारी हरजित सिंह यांच्याशी चर्चा केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. आज ज्या शौर्याने ते बोलत होते, त्याबाबत त्यांची स्तुती करण्यायोग्य आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो." 

दरम्यान, रविवारी निहंगांचा (परंपारिक हत्यारं ठेवणारे आणि लांब कुर्ता घालणारे शीख) एक गट पांढऱ्या कारमधून भाजी मंडईत आला होता. मंडी बोर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबविले आणि संचारबंदी पासबद्दल विचारणा केली. मात्र, ते थेट बॅरिकेडिंग तोडून पुढे गेले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निहंगांनी गाडीतून बाहेर पडून पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका पोलीस अधिकारी हरजित सिंह यांचा हात कापला गेला. या अधिकाऱ्याचा हात अक्षरश: शरीरापासून वेगळा झाला होता. निहंगांच्या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिस