शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 14:52 IST

रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.

हरियाणामध्ये काँग्रेस आणि आपमधील जागावाटप अडकले आहे. अशातच आपने आज सायंकाळपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेसला दिला असून आमच्या ९० उमेदवारांची यादी तयार असल्याचे म्हटले आहे. या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीचेही नाव असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. रविवारी रात्री काँग्रेस आणि आपमध्ये जागावाटपासाठी बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आपला सहा जागा देण्यास तयार होती. तर आपला १० जागा हव्या होत्या. आज सोमवारी आप-काँग्रेस आघाडीबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. आज बाबरिया यांना बीपीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी निवडणुकीचे काम न करण्याची ताकीद त्यांना दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा जागावाटपाचे घोडे अडले आहे. 

सुत्रांनुसार पंजाबला लागून असलेल्या पिहोवा, कलायत, जींद आणि एनसीआर गुरुग्राम, जुने फरीदाबाद आणि पानीपत ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आपला देण्यास काँग्रेस तयार झाले आहे. आपने पंजाबला लागून असलेली गुहला चीका ही जागाही मागितली आहे. परंतू, यावर दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता झाली नाही. 

कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिहोवा विधानसभा मतदारसंघ पंजाबला लागून आहे. येथेच पंजाब सीएम भगवंत मान यांचे सासर आहे. या भागात पंजाबी लोकांचे प्राबल्य आहे. केजरीवाल आणि मान यांनी या भागात अनेक सभा घेतल्या आहेत. यामुळे मान यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर किंवा सासरे या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असे बोलले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत आपने कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवार दिला होता. या मतदारसंघात ९ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी गुहला चीका, पिहोवा, शहादाबाद आणि कलायत या मतदारसंघात आपला लीड मिळाले होते. तर उर्वरित पाच मतदारसंघात भाजपला लीड मिळाले होते. याच आधारे आपने या जागा मागितल्या आहेत. 

टॅग्स :HaryanaहरयाणाPunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान