शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann: भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:40 IST

Bhagwant Mann: 14 एप्रिलरोजी बैसाखीच्या दिवसी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये दारुच्या नशेत गेल्याचा आरोप आहे.

चंदीगढ: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी आता गुरुद्वारांची सर्वात मोठी संस्था असलेल्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (SGPC) आपली भूमिका मवाळ केली आहे. दोन दिवसांपूर्वी एसजीपीसीने भगवंत मान यांना माफी मागण्यास सांगितले होते. पण, आता एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी म्हणतात की, "हा एक व्यक्ती आणि त्याचे गुरू यांच्यातील विषय आहे. यापुढे आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही."

अकाली दलाची वैद्यकीय चाचणीची मागणीमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 एप्रिल रोजी बैसाखीच्या दिवशी घडली होती. भगवंत मान यांनी भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वाराला भेट दिली होती. यानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी भगवंत मान दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांवर अपमानास्पद आरोप करत त्यांनी वैद्यकीय तपासणीची मागणी केली होती. 

भाजपची पोलिसात तक्रारपण, सत्ताधारी आम आदमी पक्षाने भगवंत मान यांच्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले. आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग म्हणाले की, शिअद अध्यक्ष सुखबीर बादल यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेला खोटा प्रचार दुर्दैवी आहे. सुखबीर यांनी निराधार आरोप करण्यापेक्षा सकारात्मक राजकारण करावे.

यानंतर, शुक्रवारी, एसजीपीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रघुजित सिंग, कनिष्ठ उपाध्यक्ष सुरिंदर सिंग आणि सरचिटणीस कर्नेल सिंग यांनी दावा केला की ते (पंजाबचे मुख्यमंत्री) पत्रकारांशी बोलत असताना ते दारूच्या नशेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. हा गुरूचा अपमान तर आहेच पण अनैतिकतेचा कळस आहे. याबद्दल भगवंत मान यांनी माफी मागावी. भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी तर भगवंत मान यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआप