शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Punjab: पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जैश-ए-मोहम्मदच्या पत्राने राज्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 09:12 IST

Punjab CM Bhagwant Mann threatened: जैश-ए-मोहम्मद संघटनेने मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह अकाली दलाचे नेते आणि राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन आणि मंदिरांना उडवण्याची धमकी दिली आहे.

चंदीगड:पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन उडवले जातील, अशी धमकी देण्यात आली आहे. कपूरथला स्टेसनच्या डीआरएमला हे पत्र पाठवण्यात आले आहे.

अनेक स्टेशन उडवण्याची धमकीमिळालेल्या माहितीनुसार, हे पत्र जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लिहीले आहे. राज्यातील सुलतानपूर लोधी, लोहियान खास, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट, फगवाडा, अमृतसर आणि तरनतारनसह अनेक रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी पत्रात देण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणत्याही तारखेचा किंवा दिवसाचा उल्लेख केलेला नाही.

कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळपत्र वाचून सुलतानपूर लोधी रेल्वे स्थानकाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. याची गांभीर्याने दखल घेत स्टेशन मास्तरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. पत्रात शाळकरी मुलाच्या इंग्रजी नोटबुकच्या पानावर हिंदी भाषेत धमकी लिहिली आहे. ज्या लिफाफ्यात पत्र आले आहे त्यावर टपाल तिकीट आहे, परंतु यावर कोणत्याही पोस्ट ऑफिसचा शिक्का किंवा तारीख लिहिलेली नाही.

सुपरवायजरला मिळाले पत्र सुलतानपूर लोधी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर राजबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 2.15 च्या सुमारास एक पोस्टमन पत्र घेऊन स्टेशनवर पोहोचला आणि हे पत्र पर्यवेक्षक विकास कुमार यांना मिळाले. पत्रावर त्यांचे (स्टेशन मास्तर) नाव लिहिले होते, म्हणून ते पत्र घेऊन लगेच त्यांच्याकडे आले. त्यांनी पत्र उघडून ते वाचले तेव्हा एका पानावर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी, जम्मू-काश्मीरसह कराची पाकिस्तान, जैश जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते.

'आम्ही जिहादींच्या मृत्यूचा बदला घेऊ'दुसऱ्या पानावर 'खुदा मला माफ कर, आम्ही आमच्या जिहाद्यांच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेऊ, आम्ही जालंधर रेल्वे स्टेशन, सुलतानपूर लोधी-लोहियान खास, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट, फगवाडा, अमृतसर आणि तरणतारनसह पंजाबच्या अनेक रेल्वे स्थानकांसह जालंधरमधील देवी तालाब मंदिर, पियाला येथील काली माता मंदिर, फगवाडा येथील हनुमानगढी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल, फिरोजपूर रेल्वे महाव्यवस्थापक सीमा शर्मा यांच्यासह अकाली दलाच्या नेत्यांना ठार मारणार आहोत,' असे पत्रात लिहीले आहे. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद