शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये 'आप'ला मोठा धक्का; CM भगवंत मान यांच्या बालेकिल्ल्यातच पक्षाचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:31 IST

भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत मान विजयी झाले आहेत.

अमृतसर: पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत मान यांनी मोठा विजय मिळवत आप उमेदवाराचा पराभव केला. आपचे नेते भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूक झाली. शिअदच्या सिमरनजीत मान यांनी आप उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7000 हून अधिक मतांनी पराभव केला. संगरुर ही जागा भगवंत मान यांचा बालेकिल्ला मानली जाते. अशा स्थितीत येथून पक्षाचा पराभव होणे हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालाकडे आता परिवर्तनाची लाट म्हणून पाहिले जात आहे. 

कोण आहेत सिमरजनीत मान?सिमरनजीत सिंह मान (77) हे शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1966 मध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. यानंतर 18 जून 1984 रोजी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला. त्यांचे लग्न गीतंदर कौर मान (पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांची बहीण) यांच्याशी झाले आहे. ते 1989 मध्ये तरणतारणमधून आणि त्यानंतर 1999 मध्ये संगरूरमधून खासदार झाले होते.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक