शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट मोफत वीज; पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:29 IST

Punjab Bhagwant Mann Govt First Budget : हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

चंडीगड : पंजाबच्याभगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने सोमवारी आपला पहिला अर्थसंकल्प (Punjab Budget 2022) सादर केला. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी विधानसभेत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, 1 जुलैपासून मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याची घोषणा हरपाल सिंग चीमा यांनी पंजाब विधानसभेत केली. हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

या वर्षी मार्चमध्ये आम आदमी पक्ष (आप) सत्तेत आल्यानंतर भगवंत मान सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सादर केला. यावेळी हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून राज्यातील प्रत्येक घरात दरमहा 300 युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आप सरकार सुशासनाचे मॉडेल प्रस्थापित करेल असेही हरपाल सिंग चीमा म्हणाले. ते म्हणाले की, आमचे सरकार भ्रष्टाचार खपवून घेणार नाही... आमच्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने झाला आहे.

अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा म्हणाले की, सरकारी पोर्टल आणि ई-मेलद्वारे 20,384 सूचना प्राप्त झाल्यानंतर अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून आरोग्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. पहिल्या वर्षी आमचे लक्ष तीन मुख्य गोष्टींवर असेल - बिघडलेले वित्तीय आरोग्य सुधारणे, सार्वजनिक पैशाचा प्रभावी वापर सुनिश्चित करून सुशासनाची आश्वासने पूर्ण करणे आणि आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे. 

शैक्षणिक अर्थसंकल्पात वाढपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी  आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात पैशांची कमतरता असतानाही शैक्षणिक अर्थसंकल्पात वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शैक्षणिक अर्थसंकल्प 17 टक्क्यांनी वाढले आहे. तंत्रशिक्षणाच्या अर्थसंकल्पामध्ये 48 टक्के आणि वैद्यकीय शिक्षणाच्या अर्थसंकल्पामध्ये  57 टक्के वाढ करण्यात आली आहे.

काय आहे शैक्षणिक बजेटमध्ये?पंजाब सरकारच्या शैक्षणिक अर्थसंकल्पामध्ये सरकारी शाळांच्या इमारतींची स्थिती सुधारणे, सर्व शाळांच्या सीमारेषा बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय देश-विदेशातील शिक्षकांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, स्वच्छतेची व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, मुलांना नोकरी शोधणारे नसून रोजगार निर्माण करणारे बनवण्यासाठी शिक्षण योजनाही जाहीर करण्यात आली आहे.

पंजाब अर्थसंकल्पाबाबत मनीष सिसोदियांचे ट्विट पंजाबमधील आप सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पहिल्या बजेटमध्ये पैशांची कमतरता असतानाही शैक्षणिक बजेटमध्ये शानदार वाढ केली आहे. पंजाबमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत शालेय शिक्षणाच्या बजेटमध्ये 17 टक्के, तांत्रिक शिक्षणाच्या बजेटमध्ये 48 टक्के आणि वैद्यकीय शिक्षणाच्या बजेटमध्ये 57 टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :PunjabपंजाबBudgetअर्थसंकल्प 2022Bhagwant Mannभगवंत मानAAPआप