शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमीचा 'खास' माणूस, केजरीवालांनी पंजाबसाठी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 13:31 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे

नवी दिल्ली - देशभरात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Election 2022) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाच राज्यांपैकी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाब आणि गोवा या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आपची जादू पहायला मिळाली आहे. त्यामुळे, येथे आम आदमी पक्षाचे प्रभुत्वही दिसून येते. आता, पंजाबमधील निवडणुकांसाठी आपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत असून भाजपचेही आव्हान या दोन्ही पक्षांनी असणार आहे. तसेच, तेथील प्रादेशिक पक्षांनाही आम आदमीला तोंड द्यावे लागणार आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलन, व यावेळी राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका या निवडणुकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.    भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे नेते असून सध्या पंजाबमधील संग्रुर लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले आहेत. त्यामुळे, केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणा करत आपला पत्ता ओपन केला आहे. आता, भाजपा आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणता उमेदवार घोषित होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

दरम्यान, पंजाब विधानसभेच्या ११७ निवडणुकांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीChief Ministerमुख्यमंत्रीArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२