शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Assembly Election 2022: पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या बाजूने होते ४२ आमदार, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:19 IST

Punjab Assembly Election 2022: काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर नवीन मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते अजामावली असता  ७९ पैकी ४२ आमदार माझ्या बाजूने होते, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी केला आहे.

- बलवंत तक्षकचंदीगड :   काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर नवीन मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते अजामावली असता  ७९ पैकी ४२ आमदार माझ्या बाजूने होते, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी केला आहे.अबोहर मतदार संघात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात जाखड यांनी उपरोक्त दावा केला. ते असेही म्हणाले की,  चरणजित सिंग चन्नी यांच्या बाजूने त्यावेळी फक्त दोनच आमदार होते, तरी ते मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या बाजूने १६ आमदार आणि  खासदार परणित कौर यांच्या बाजूने १२ आमदार होते. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बाजूने ६ आमदार होते.चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मला उपमुख्यमंत्रिपद देऊ केले होते. परंतु, यासाठी मी तयार नव्हतो.  मी आमदार नसतानाही मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव घेण्यात आले होते. याबद्दल मी पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसच्या आमदारांचा आभारी आहे.श्रेष्ठींनी जाखड यांना बंगळुरूहून बोलावले तेव्हा  कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी मुख्यमंत्रिपद जाखड यांना मिळेल, असे मानण्यात आले होते. परंतु, अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी पंजाबचा मुख्यमंत्री शीख समुदायाची व्यक्तीच असावी, असे स्पष्ट केल्याने जाखड या शर्यतीत मागे पडले.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२