शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

३५० रुपये आणि जेवण; केजरीवालांनी सभेसाठी पैसे देऊन जमवली माणसं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 4:02 PM

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे.

हिसार- नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. हरियाणात आम आदमी पार्टीचं सरकार आल्यास शेतक-यांसाठी आयोगाच्या शिफारशी लागू होतीलच. तसेच स्वास्थ्य, शिक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही चांगलं काम केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं होतं. परंतु आता त्यांच्या रॅलीसंदर्भात जी माहिती मिळत आहे, ती आश्चर्यचकित करणारी आहे.केजरीवाल मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहिलेल्या कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवरच गंभीर आरोप केले आहेत. मिश्रा यांनी केजरीवालांच्या रॅलीनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत रॅलीमध्ये आलेली काही माणसे दावा करत आहेत की, रॅलीसाठी आम्हाला 350 रुपये आणि जेवण देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीची टी-शर्ट आणि टोपी घालून रॅलीमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं. व्हिडीओमध्ये एका मजुरानं या प्रकाराला वाचा फोडली आहे.तो म्हणाला, रॅली संपल्यानंतर तुम्हाला 350 रुपये देणार असं सांगण्यात आलं होतं. 350 रुपये देऊन आम्हाला बोलावलं होतं. आम्ही एकूण 118 लोक आलो होतो. परंतु आता उद्या पैसे घेऊन जा, असं सांगितलं जातंय. तर दुस-या एका व्हिडीओमध्ये काही मजुरांनी दावा केला आहे की, आम्ही बहादूरगडच्या मंडी येथे राहत असून, आम्हाला रॅलीला चहा-नाश्तासकट पैसे देण्याचं कबूल केलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ही रॅली काढली होती.हरियाणाच्या हुड्डा सरकारनं जो भ्रष्टाचार सुरू केला. तो भ्रष्टाचार खट्टर सरकारनं पाच पटीनं वाढवला आहे, असं केजरीवाल म्हणाले होते. भाजपा आणि काँग्रेसनं मतांच्या राजकारणासाठी हरियाणात जाट आणि इतर समाजांमध्ये दंगली भडकावल्या होत्या. गेल्या तीन वर्षांत हरियाणात जातीवादाच्या नावाखाली खूप हिंसा झाली आहे. परंतु खट्टर सरकार गाढ झोपेत आहे. देशातल्या बँका असुरक्षित असल्याचंही केजरीवालांनी सांगितलं आहे. नीरव मोदी आणि विजय माल्याला परत भारतात केव्हा आणणार, असा प्रश्नही विचारला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालHaryanaहरयाणाAAPआप