हिसार- नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. हरियाणात आम आदमी पार्टीचं सरकार आल्यास शेतक-यांसाठी आयोगाच्या शिफारशी लागू होतीलच. तसेच स्वास्थ्य, शिक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही चांगलं काम केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं होतं. परंतु आता त्यांच्या रॅलीसंदर्भात जी माहिती मिळत आहे, ती आश्चर्यचकित करणारी आहे.केजरीवाल मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहिलेल्या कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवरच गंभीर आरोप केले आहेत. मिश्रा यांनी केजरीवालांच्या रॅलीनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत रॅलीमध्ये आलेली काही माणसे दावा करत आहेत की, रॅलीसाठी आम्हाला 350 रुपये आणि जेवण देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीची टी-शर्ट आणि टोपी घालून रॅलीमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं. व्हिडीओमध्ये एका मजुरानं या प्रकाराला वाचा फोडली आहे.
३५० रुपये आणि जेवण; केजरीवालांनी सभेसाठी पैसे देऊन जमवली माणसं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 16:02 IST