शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

Punjab: पंजाबमध्ये आपच्या महिला आमदाराला पतीची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 08:18 IST

Punjab AAP MLA: पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या एका महिला आमदाराला पतीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे.

- बलवंत तक्षकचंडीगड : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या एका महिला आमदाराला पतीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी म्हटले आहे की, आजवर हे प्रकरण चार भिंतींमध्ये होते; परंतु आता व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आयोग कारवाई करणार आहे.

घरगुती हिंसाचाराची शिकार झालेल्या आ. प्रो. बलजिंदर कौर आहेत. त्या तलवंडी साबो मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे पती सुखराज बल त्यांना थप्पड लगावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुलै महिन्यातील असून, त्याचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आता समोर आले आहे. पतीशी वादानंतर बलजिंदर कौर माहेरी निघून गेल्या. त्यांचे पती सुखराज बल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मंत्री न झाल्यामुळे होत्या नाराजप्रो. बलजिंदर कौर आप सरकार स्थापनेच्या कालावधीत मंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. याबद्दल त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केलेली आहे. अलीकडे त्या राजकीय रूपाने सक्रियही नाहीत. महिला व बालविकास मंत्री डॉ. बलजित कौर यांनी म्हटले आहे की, बलजिंदर कौर यांच्याकडून कसलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. 

टॅग्स :AAPआपCrime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब