शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Punjab AAP: पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 18:55 IST

Punjab AAP:'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान येत्या 16 मार्च रोजी शहीद भगत सिंग यांच्या खटकर कलान या गावी शपथ घेणार आहेत.

अमृतसर: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांचा रविवारी अमृतसरमध्ये मेगा रोड शो झाला. यावेळी पंजाबच्या जनतेला संबोधित करताना त्यांनी भगवंत मान यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच, आम आदमी पक्षाच्या आमदारांसह इतर आमदारांना कडक शब्दात इशाराही दिला.

'भगवंत मान अतिशय प्रमाणिक'अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''माझा लहान भाऊ भगवंत मान(bhagwant Maan) हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे. पंजाबला आतापर्यंतचा सर्वात प्रामाणिक मुख्यमंत्री मिळाला आहे. पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार स्थापन होईल. आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा राज्यातील कुठल्याही आमदाराने पैशांचा घोटाळा केला, तर त्याला थेट तुरुंगात टाकले जाईल. काही लोक पंजाबला लुटत होते, आता ही लूट थांबेल. आता सरकारचा प्रत्येक पैसा गरिबांवर खर्च केला जाईल, पंजाबवर खर्च केला जाईल.''

'दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार'ते पुढे म्हणाले की, ''आपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. काहींना वेळ लागेल, काही लगेच पूर्ण होतील, पण पूर्ण नक्की होतील. 16 मार्चला भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, पण त्या दिवशी फक्त भगवंत मान मुख्यमंत्री होणार नाहीत, तर पंजाबचा प्रत्येक मुलगा मुख्यमंत्री होईल.'' यावेळी केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या दिवशी पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.

'संपूर्ण जगाने पंजाबचा विक्रम पाहिला'यावेळी भगवंत मान म्हणाले की, ''पंजाबच्या कानाकोपऱ्यातील पंजाबींनी 10 मार्चला जो विक्रम नोंदवला, तो यापूर्वी कधीच घडला नव्हता. हा विक्रम संपूर्ण जगाने पाहिला. तुम्ही चांगल्या कामांना मत दिले, लुटारुंचा 50-50 हजार मतांनी पराभव केला आहे.''

'पोलिसांचे काम पोलिस करतील'भगवंत मान पुढे म्हणाले की, ''आप हा चळवळीबाहेरचा पक्ष आहे. उपोषण करुन तयार झालेला हा पक्ष आहे. पहिल्या दिवसापासून या सरकार जोमाने काम करेल. आम्ही पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी 122 माजी नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पोलिसांना पोलिसांची कामे करायला मिळतील, त्यांना त्रास होणार नाही.''

रोड शोपूर्वी सुवर्ण मंदिरात नतमस्तक रोड शो काढण्यापूर्वी आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाले. तत्पूर्वी, मान यांनी केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे विमानतळावर स्वागत केले. 11 मार्च रोजी मोहाली येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 16 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता नवाशहर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे होणार आहे. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाब