शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 22:38 IST

Pune Accident News: पुण्यामधील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, या प्रकरणात भरधाव कार चालवून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘बाळा’ची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तर आरोपी ‘बाळा’ला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेले त्याचे वडील आणि आजोबा यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अपघात घडला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

पुण्यामधील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, या प्रकरणात भरधाव कार चालवून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘बाळा’ची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तर आरोपी ‘बाळा’ला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेले त्याचे वडील आणि आजोबा यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अल्पवयीन ‘बाळा’ला मद्य देणाऱ्या बारच्या संचालकांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, अपघात घडला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातावेळी तिथे उपस्थित असलेल्या अमीन शेख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अपघात घडला तेव्हा मी १० फूट अंतरावरून रस्ता पार करत होतो. अपघातात दोन जणांना चिरडल्यानंतर त्या ‘बाळा’ला जमाव पकडून मारहाण करत होता. तर हा ‘बाळ’ हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका, मी हवे तेवढे पैसे आणून देतो, असं ओरडत होता.

दरम्यान, हा दावा करणारे अमीन शेख हे अपघातस्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही दिसत आहेत. ते रस्ता पार करून जातात आणि काही सेकंदांच्या अवधीने पोर्श कार तिथून भरधाव वेगात आली आणि दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला धडक दिली. त्यात त्या तरुण तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी ‘बाळा’ला जमावाने पकडून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात