शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची शहीद जवानांसाठी भावूक पोस्ट, काय लिहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:37 IST

Pulwama Terror Attack: १४ फेब्रुवारी २०१९...तो दिवस आणि आपल्या ४० जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही. आज या घटनेला ६ वर्षे पूर्ण होत असताना, संपूर्ण देश आपल्या शूर सुपुत्रांच्या स्मृतींना उजाळा देत आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आज संपूर्ण देशाने अभिवादन केले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जवानांच्या अदम्य साहसाचा गौरव केला. त्यांनी लिहिले की, "२०१९ मध्ये आजच्या दिवशी पुलवामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या  शूर वीरांचे स्मरण करताना, त्यांची भक्ती, दृढनिश्चय आणि देशसेवा नेहमीच आपल्या मनात राहील. प्रत्येक भारतीय त्यांच्या धाडसातून शक्ती मिळवतो. जवानांच्या या त्यागामुळेच देश सुरक्षित असून त्यांचे शौर्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

उपराष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

उपराष्ट्रपतींनी देखील या प्रसंगी जवानांच्या सर्वोच्च त्यागाचा गौरव केला. ते म्हणाले, "पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मृतीत नेहमीच कोरले जाईल आणि एक मजबूत आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील."

'तो'काळा दिवस!

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन आदळले. या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pulwama Attack Anniversary: PM Modi's Tribute to Martyred Soldiers

Web Summary : India remembers Pulwama attack martyrs. PM Modi paid tribute, honoring their courage and sacrifice for the nation. The Vice President also expressed condolences. The 2019 attack claimed 40 lives, leading to retaliatory airstrikes.
टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान