शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:28 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे! 

राष्ट्रीय आपत्ती जाहीर कराया हल्ल्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे. तसेच सात दिवसांचा दुखवटा जाहीर करावा. त्यामुळे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांप्रती सन्मान व देशातील एकता यातून दिसून येईल. युद्धासाठी सर्वांनी तयार रहायला हवे. बाह्य आणीबाणी घोषित करावी. हल्ला हाच संरक्षणाचा सर्वात मोठा मार्ग आहे.- राम कोरके, सेवानिवृत्त नायक, तोफखाना रेजिमेंटमर्यादित युद्धाचा विचार करावाभारताने पाकिस्तानसोबत मर्यादित युद्धाचा विचार करावा. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या अनेक नद्यांचे पाणी अडवून गोची करावी. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी आज धडपड करत आहे. भारताने बलुच नेत्यांना शक्य ती सर्व मदत करावी. काश्मीरमधील अनेक भारतीय राजकारणी पाकिस्तानधार्जिणे धोरण राबवताना दिसतात. त्यांच्या नांग्या ठेचाव्यात.- आशिष पाटील, संभाजीनगर, कोल्हापूर.धमाका कराशहीद भगत सिंग यांनी ब्रिटिश काळात जसे असेम्बलीमध्ये बॉम्ब फेकला आणि त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की ‘बहरो को सुनाने के लिये धमाको की जरूरत होती है’ अगदी त्या प्रमाणे भारत सरकारलासुद्धा असेच काही पाऊल उचलावे लागणार आहे. त्याशिवाय दहशतवादी आणि पाकिस्तान यांचे कंबरडे मोडणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला संपवला. भारतानेसुद्धा तसेच भीषण सर्जिकल स्ट्राइक करून संपूर्ण दहशतवाद संपवावा.- वैभव आसरकर, अकोट, जि. अकोलाघरभेद्यांचा बंदोबस्त कराकाश्मीरचा विशेष दर्जा काढावा, माजी सैनिक व इतर राज्यातील इच्छुक नागरिकांना काश्मिरमध्ये रहाण्याची परवानगी द्यावी. सच्च्या भारतीयांची संख्या वाढल्यास पाकिस्तानी धार्जिणे लोकांवर आपोआपच वचक बसेल. सैनिकी कारवायांमध्ये अडचणी निर्माण करणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अशा कामे करणाºया घरभेद्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.- दिलीपकुमार खिस्ते,कामोठे, ता. पनवेल जि. रायगडजशास तसेच उत्तर हवेजशास-तसे उक्ती प्रमाणे आता खुले-आम सामना केला तरच दहशतवाद्यांवर जरब बसेल. कआज आपले राष्ट्र दहशतवाद्यांसाठी प्रयोगशाळा झाली आहे, दहशतवादाचे वेग-वेगळे प्रयोग खुले-आम होत आहेत अशावेळी आपण स्वत: खंबीर असतांना वाट का बघतो? कुठलाही राजकीय हेतू अथवा मनसुबा न बाळगता दहशतवादी अड्डे असलेल्या देशांना संघटीतपणे धडा शिकवणे योग्य ठरेल.- प्रमोद सुभाषराव डांगे (कुलकर्णी) नक्षत्रवाडी, औरंगाबाद.दहशतवाद संपवाभारतीय सैन्यदलावर झालेला भ्याड हल्ला हा भारतातील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांवर झालेला हल्ला आहे. ना हिंदु - ना मुस्लीम, ना सिख - ना इसाई, आम्ही फक्त आणि फक्त भारतीय आहोत. सर्जिकल स्ट्राईकनंतर परत हा हल्ला झाल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच दिसते. म्हणूनच त्यांना आता कायमचे संपवण्याची गरज भारतातील प्रत्येक नागरिकास वाटते आहे.- प्रशांत माळी, मु.पो. मापटेमळाता. आटपाडी, जि. सांगलीपाकची कोंडी करापुलवामातील दहशतवाद्यांच्या अमानवीय, क्रूर हल्याचा मी निषेध करतो तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन भागणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची सर्व पातळ्यांवर कोंडी करुन जगापुढे त्यांना उघडे पाडावे लागेल.- साजेद खान, औरंगाबादराष्ट्रीय कायदा बनवादहशतवादाला कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नावरच केंद्रीय गुन्हा (फेडरल क्राइम) मानले गेले पाहिजे आणि हा गुन्हा रोखण्यासाठी अमेरिकेतील ‘होमलँड सेक्युरिटी अ‍ॅक्ट’च्या धर्तीवर भारतात एक सर्वसमावेशक राष्ट्रीय कायदा बनवायला हवा.- लालन शर्मा, 9673902887एक महिन्याचा पगार देतोपुलवामामध्ये झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. मी एक सरकारी कर्मचारी आहे, आणि अस काही ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मी माझी एक महिन्याचा पगार द्यायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान एक धाडसी निर्णय घेतील आणि त्यांना सडेतोड उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे.- उदेश पवार, (वाहतूक नियंत्रण) नवी मुंबई महानगर पालिकाना मंदिर, ना आरक्षण चाहिये, ना १५ लाख चाहीये, बस मोदीजी अब ४० के बदले ४०० चाहिये.- अरविंद जाधव, खडका, घनसावंगी, जि.जालना

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाLokmatलोकमतMartyrशहीद