शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 15:51 IST

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना हौतात्म्य

नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी उरीमध्ये झालेल्या हल्ल्याची जखम अद्याप भळभळती आहे. भारतीय नागरिक अद्याप हा हल्ला विसरलेले नाहीत. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरघोड्या सुरुच राहिल्या. काल काश्मीरमधील पुलवामात झालेल्या हल्ल्यानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा जगासमोर आणला. पाकिस्तान माणुसकीची चिंता नाहीच, मात्र तो आंतरराष्ट्रीय नियमांनादेखील जुमानत नाही, हेच कालच्या हल्ल्यानं अधोरेखित केलं. उरीत भारताचे 19 जवान शहीद झाले. पुलवामातील हल्ला यापेक्षा भीषण ठरला. यामध्ये सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. उरी आणि पुलवामा या दोन हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच होतं. याशिवाय दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांच्याकडून होणारा गोळीबारदेखील थांबला नव्हता. भारतीय सैन्य या दुहेरी आव्हानांचा सामना करत असताना काल पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाला. यात भारतभूमीचे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सुपुत्र गमावले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली. काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक