शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:52 IST

पाकिस्तानातील जिहादी गटांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)च्या मागील सहा बैठकांना अजहर आजारपणामुळे हजर राहू शकलेला नव्हता.

श्रीनगर : जैश-ए-मोहम्मद (जेइएम)चा प्रमुख मसूद अजहर हा रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात दाखल असून तिथून त्याने पुलवामा हल्ल्याची सूत्रे हलविली अशी माहिती आता उजेडात आली आहे. आजारपणामुळे गेल्या चार महिन्यांपासून तो रुग्णालयात उपचार घेत आहे.

पाकिस्तानातील जिहादी गटांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)च्या मागील सहा बैठकांना अजहर आजारपणामुळे हजर राहू शकलेला नव्हता. पुलवामा हल्ल्याच्या आठ दिवस आधी आपल्या हस्तकांसाठी त्याने एक ध्वनिमुद्रित संदेश पाठविला होता. त्यात म्हटले होते की, या युद्धात मरण येण्याइतकी भाग्यदायी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. भारताविरोधात आपण करत असलेल्या कारवायांना कोणी देशद्रोही कृत्ये म्हणतील, देशातील शांततेला धोका असल्याचाही प्रचार होईल, पण त्याकडे दुर्लक्ष करा.हल्ल्याची माहिती मसूदने यूजेसीच्या अन्य सदस्यांनाही कळू दिली नव्हती. अजहरचा ध्वनिमुद्र्रित संदेश ऐकवून त्याचा भाचा मोहम्मद

उमैर व अब्दुल रशीदगाझी काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवत होते. त्यांना आत्मघाती हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करत होते.सध्या काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ६० दहशतवादी सक्रिय असून त्यातील ३५ जण पाकिस्तानी व बाकीचे स्थानिक आहेत. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाmasood azharमसूद अजहर