शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा भ़डका! सामान्यांच्या ताटातून गायब होऊ शकते डाळ; दरात तब्बल 16 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:49 IST

Pulses Price Hike : महागाईच्या सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही.

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून महागाईचा आता भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलसह आता साबण, कॉफी, मॅगीसह अनेक जीवनावश्यक असलेल्या वस्तुंचे भाव वाढत आहेत. महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही. कारण येणाऱ्या दिवसांत लोकांना आवश्यक असणाऱ्या सामानासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सामान्यांच्या ताटातून डाळ गायब होऊ शकते. कारण डाळींच्या किंमतीत 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

आता डाळीचे दर वधारले आहेत. मागील जवळपास एका महिन्यात दाळीच्या दरात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. डाळ, भाज्या, फळांसह खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होणार आहे. देशात पेट्रोल - डिझेल दर वाढल्याने या खाद्यसामग्रीचे दर वाढले आहेत. त्याशिवाय शाळा, कॉलेज, हॉटेल, रेस्टोरंट ओपन झाल्याने याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तूर डाळीच्या मोठ्या उत्पादकांपैकी एक आहेत. यंदा तूर डाळीचं उत्पादन 30 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काबूली चण्याचा भाव मागील महिन्यात 95 रुपये प्रति किलो होता, तो आता वाढून 110 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. चणे 5000 रुपये प्रति क्विंटल वरुन वाढून 5100 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. 

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकात तूर डाळ 6,400 ते 6,500 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे. हा दर आधी 6,300 रुपये प्रति क्विंटल होता. केवळ डाळच नाही तर फळं आणि इतर गोष्टींच्या किमतीही वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत फळांच्या किंमती वाढल्या आहेत. उन्हाळ्यात फळांची मागणी वाढली असून आवक कमी आहे. त्यामुळे किमतीही वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inflationमहागाई