शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांवरील गुन्हे जनतेला कळू देत, ते वेबसाईटवर प्रकाशित करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:31 IST

नेत्यावरील गुन्ह्याची माहिती वेबसाइटवर प्रकाशित करा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

ठळक मुद्देनेत्यांवरील गुन्हे जनतेला कळू देत, ते वेबसाईटवर प्रकाशित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. जकीय पक्षांच्या नेत्यांच्या गुन्ह्यांची माहिती वेबसाइटवर अपलोड करा, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयानं काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नवी दिल्लीः उमेदवारी दिलेल्या नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती वेबसाइटवर प्रकाशित करा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गुन्ह्यांची माहिती वेबसाइटवर अपलोड करा, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयानं काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं राजकीय नेत्यांवर असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात हा मोठा निर्णय दिला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड हा वृत्तपत्र, वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करा. तसेच गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना राजकीय पक्ष उमेदवारी का देतात हेसुद्धा स्पष्ट करावं, असेही न्यायालयानं निर्णयात म्हटलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी गंभीर गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठाम भूमिका घेत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखणे सुप्रीम कोर्टाच्या हातात नाही. त्यासाठी संसदेनेच तसा कायदा करण्याची आवश्यकता आहे. उमेदवाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याची मतदारांना माहीत व्हावी, यासाठी त्याने ती माहिती सविस्तरपणे उमेदवारी अर्ज दाखल करताना देण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनीही उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत मतदारांना विस्ताराने सांगण्याची गरज आहे,' असे मत माजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गेल्या वर्षी व्यक्त केले होते. एकीकडे राजकीय गुन्हेगारीवरून गळे काढत असताना मतदारही अशा उमेदवारांनाच निवडून देणे पसंत करतात. राजकीय पक्षांनी निवडणूक लढविण्याची संधी दिली, तरी त्या उमेदवाराला आपला लोकप्रतिनिधी बनण्याची संधी द्यायची की नाही, हा निर्णय मतदारांना घ्यायचा आहे.

सध्या गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होत नाही, तोपर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी आणता येत नाही. राजकीय गुन्हेगारी रोखण्यासाठी सध्याचा कायदा कमकुवत ठरत आहे. त्याचाच फायदा राजकीय गुन्हेगार घेताना दिसतात. शिवाय आपल्या न्यायव्यवस्थेवरील भार पाहता, अशा प्रकारचे गुन्हे सिद्ध होईपर्यंत एखाद्या गुन्हेगाराचा विजयी होऊन कार्यकाळही संपतो. अशा मोठ्या गुन्ह्यांमध्ये भीतीपोटी अनेक साक्षीदार साक्षच द्यायला येत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळे संबंधित उमेदवाराचे गुन्हे हे मतदारांनाही समजणार आहे. त्यामुळे त्याला मतदान करायचं की नाही हे त्यांना ठरवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय