शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीजन्य पुराव्यांवर लाेकसेवक ठरतील दाेषी, भ्रष्टाचार सिद्ध करण्यास पुरेसे ; सुप्रीम काेर्टाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 05:53 IST

इतर पुराव्यांच्या आधारे लोकसेवकाच्या अपराधाचे अनुमान लावून मूल्यांकन केले जाऊ शकते का, या प्रश्नावर विचार करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अवैध लाभ मिळविण्याच्या आराेपांमध्ये प्रत्यक्ष तोंडी किंवा कागदोपत्री पुरावे नसल्याास परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे एखाद्या लोकसेवकाला दोषी ठरवले जाऊ शकते, असा महत्त्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने याबाबत म्हटले की न्यायालयाने म्हटले की, तक्रारदाराकडे (थेट किंवा प्राथमिक) पुरावे उपलब्ध नसताना अनुमानावर आधारित निष्कर्ष काढण्याची परवानगी आहे. 

बेकायदा लाभाच्या मागणीबाबत प्रत्यक्ष किंवा प्रथमदर्शनी पुरावे नसताना, इतर पुराव्यांच्या आधारे लोकसेवकाच्या अपराधाचे अनुमान लावून मूल्यांकन केले जाऊ शकते का, या प्रश्नावर विचार करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

काय म्हणाले न्यायालय...जर तक्रारदाराने साक्ष फिरविली किंवा तो मरण पावला किंवा खटल्यादरम्यान पुरावे सादर करू शकला नाही, तर दुसऱ्या साक्षीदाराचा तोंडी किंवा कागदोपत्री पुरावा स्वीकारून बेकायदेशीर लाभ मागितल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकतो तसेच परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध करू शकतो.

काय आहे कायदा?nलाचलुचपत प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक-२०१८ मध्ये लाच देणाऱ्यालाही कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले. यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची तरतूद आहे. nलोकसेवकांवर भ्रष्टाचाराचा खटला चालवण्यापूर्वी केंद्राच्या बाबतीत लोकपाल आणि राज्यांच्या बाबतीत लोकायुक्तांची परवानगी घ्यावी लागेल. nलाच देणाऱ्याला आपली बाजू मांडण्यासाठी ७ ते १५ दिवसांपर्यंत अवधी मिळू शकताे. लाच कोणत्या परिस्थितीत देण्यात आली हेदेखील पाहिले जाईल.

मृत्यू किंवा इतर कारणांमुळे तक्रारदाराकडे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसल्यास लाेकसेवकाला प्रासंगिक तरतुदींच्या आधारे दाेषी ठरविता येऊ शकते. असे खटले कमजोर पडता कामा नयेत, तसेच भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा झाल्याशिवाय ते निकाली लागू नयेत.     - सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBribe Caseलाच प्रकरण