सिमला - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान, यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. मात्र राहुल गांधीजी मी तुम्हाला आव्हान देतो की या कायद्यात कुठेही कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद आहे का? हे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांनी दिले आहे. राहुल गांधींवर घाणाघाती टीका करताना अमित शाह म्हणाले की, ''मी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, सर्वप्रथम नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समजून घ्या आणि नंतर इतरांनाही समजावून सांगा. नाहीतर खोटारडेपणा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे राजकीय पक्ष आपल्या व्होटबँकेच्या राजकारणासाठी आपल्याला एकमेकांविरोधात असेच लढवत राहतील.''
CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 16:27 IST