शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

३०० युनिट घरगुती वीज मोफत देण्याची तरतूद, मान सरकारचा पहिला अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:54 IST

भगवंत मान सरकारने कागदरहित अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे २१ लाख रुपये वाचतील आणि ३२ टन कागदाची बचत होईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १४ टक्क्यांनी जास्त आहे.

बलवंत तक्षक

चंडीगड : पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारने सोमवारी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात जुलैपासून राज्यातील लोकांना ३०० युनिटपर्यंत घरगुती वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक लाख ५५ हजार ८६० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात मात्र  १८ वर्षांपुढील महिलांना दरमहा  एक हजार रुपये देण्याचा कोणताही उल्लेख नाही. भगवंत मान सरकारने कागदरहित अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे २१ लाख रुपये वाचतील आणि ३२ टन कागदाची बचत होईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १४ टक्क्यांनी जास्त आहे. पंजाबचे वित्तमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सांगितले की, सरकारचा भर वित्तीय स्थिती सुधारणे, उत्पन्न वाढविण्यासोबत खर्च कमी करणे, आरोग्य आणि शिक्षणावर भर असेल.  करचोरीचे रोखण्यासाठी कर गुप्तचर शाखा स्थापन केली जाईल. एक आमदार, एक पेन्शन योजना लागू करण्याचीही त्यांनी घोषणा केली. यामुळे वर्षाकाठी १९ कोटी ५३ लाख रुपयांची बचत होईल.जीएसटी वसुलीत २७ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सरकारी  तिजोरीत ४,३५० कोटींची भर पडेल.  या वित्तीय वर्षात दारू विक्रीतून सरकारला ५६ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे ९,६४८ कोटी रुपयांची कमाई होण्याची आशा आहे.  पोलीस दलाचे आधुनिकीकरण, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण तसेच प्रत्येक जिल्ह्यात सायबर गुन्हा नियंत्रण कक्ष स्थापनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यके जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबBudgetअर्थसंकल्प 2022electricityवीज