शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ते' हिंदू संस्कृतीच्या विरोधात; रेल्वेच्या 'त्या' सेवेला भाजपा खासदाराचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:13 IST

भाजपा खासदाराचं रेल्वे मंत्र्यांना पत्र

इंदूर: प्रवाशांना मसाज सुविधा देण्याची घोषणा करणाऱ्या रेल्वेवर भाजपा खासदारानं टीका केली आहे. मसाज सुविधा भारतीय संस्कृती विरोधात असल्याचं इंदूरचे खासदार शंकर ललवानींनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना पत्रदेखील लिहिलं आहे. महिलांच्या समोर अशा प्रकारची सेवा देणं संस्कृतीत बसत नसल्याचं ललवानींनी पत्रात नमूद केलं आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये इंदूरमधून सुटणाऱ्या 39 गाड्यांमध्ये मसाजची सुविधा पुरवण्यात येईल, अशी घोषणा गेल्याच आठवड्यात रेल्वेनं केली. यासाठी पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागानं प्रस्ताव दिल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सेवेतून वर्षाकाठी 20 लाखांचं उत्पन्न मिळेल, अशी आशा रेल्वेला आहे. मात्र रेल्वेच्या या सुविधेला विरोध करत ललवानींनी भाजपाला घरचा आहेर दिला.महिलांसमोर अशा प्रकारची सेवा देणं भारतीय संस्कृतीत बसतं का, असा प्रश्न ललवानींनी  रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. रेल्वेत प्रवाशांना प्रथमोपचार पुरवणं, डॉक्टर उपलब्ध करणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणं गरजेचं नाही, असं आपलं मत असल्याचं ललवानींनी 10 जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  रेल्वेकडून गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम अशा तीन प्रकारात मसासची सुविधा देण्यात येणार आहे. गोल्ड प्रकारात नॉन स्टिकी किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करण्यात येईल. यासाठी 100 रुपये आकारले जातील. डायमंड प्रकारात एसेन्शियल ऑईल वापरलं जाईल. त्यासाठी 200 रुपये शुल्क असेल. तर प्लॅटिनम मसाजमध्ये क्रीमचा वापर करण्यात येईल. यासाठी 300 रुपये आकारण्यात येतील. 15 ते 20 मिनिटं ही सेवा पुरवली जाईल.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलBJPभाजपा