शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

'विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू; ईशान्येतील संस्कृती नष्ट होणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:21 IST

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचा छळ ‘सीएए’वादंगामुळे जगासमोर

कोलकाता : पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारा धार्मिक छळ नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (सीएए) माजलेल्या वादंगामुळे प्रकर्षाने जगासमोर आला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे म्हटले आहे.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने कोलकात्यातील बेलूर मठामध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे तर ते देण्यासाठी बनविण्यात आला आहे. या कायद्याने कोणालाही एका रात्रीत भारतीय नागरिकत्व मिळणार नाही हे युवकांना मी सांगू इच्छितो. धार्मिक छळामुळे परागंदा व्हावे लागलेल्यांना भारतीय नागरिकत्व द्यावे, असा विचार महात्मा गांधी यांनी मांडला होता. आम्ही फक्त त्या विचाराची अंमलबजावणी करीत आहोत.

ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे ईशान्य भारतातील रहिवाशांची ओळख व संस्कृतीचे अस्तित्व नष्ट होणार नाही. या कायद्यातील तरतुदी अत्यंत स्पष्ट असतानाही काही जण त्याबाबत केवळ राजकीय स्वार्थासाठी युवकांची दिशाभूल करीत आहेत. गेली ७० वर्षे अल्पसंख्याकांवर अत्याचार केल्याबद्दल पाकिस्तानला जगाला उत्तर देणे या कायद्यामुळे भाग पडणार आहे. पाकिस्तानात मानवी हक्क पायदळी तुडविले गेले आहेत. या गोष्टी भारतीय युवकांनी समजून घेतल्या पाहिजेत. पाच वर्षांपूर्वीपेक्षा देशातील सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. भारतीय युवकांकडून आता साऱ्या जगाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलूर मठामध्ये जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. मोदी यांनी शनिवारी रात्री बेलूरच्या मठातच वास्तव्य केले होते. तसे करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास रामकृष्ण मिशनचा नकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बेलूर मठातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास रामकृष्ण मिशनने नकार दिला. आमची अराजकीय संस्था असून तात्कालिक गोष्टींबाबत आम्ही काहीही बोलू इच्छित नाही, असे रामकृष्ण मिशनचे सरचिटणीस स्वामी सुविरानंद यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.कायदा रद्द करणार नाही : नक्वी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अतिशय ठाम आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. संसदेने संमत केलेल्या या कायद्यामध्ये बदल करण्यात येणार नाही हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले. डावे, काँग्रेसने केली निदर्शनेमोदींच्या कोलकाता दौºयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सलग दुसºया दिवशीही कोलकाता व पश्चिम बंगालच्या अन्य भागांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने सुरूच ठेवली होती. मोदी परत जा, भाजपचा निषेध असो, अशा घोषणा देत निदर्शकांनी कोलकात्यातील एस्प्लनेड परिसर शनिवारी रात्री व रविवारी सकाळीही दणाणून सोडला होता. पंतप्रधान मोदींना ते कोलकात्यात दाखल होताच निदर्शकांनी काळे झेंडेही दाखविले होते.

२५ हिंदू कुटुंबांचे भाजप आमदार पुनर्वसन करणारपाकिस्तानातून धार्मिक छळामुळे भारतात आश्रयाला आलेल्यांपैकी २५ हिंदू कुटुंबांचे मुजफ्फरनगर येथील कवाल गावात पुनर्वसन करण्याची घोषणा खटौली येथील भाजप आमदार विक्रम सैनी यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान