शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'विरोधकांत लाथाळ्या; भाजपपुढे नाही आव्हान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:16 IST

भाजपचे प्रभारी नंद किशोर यादव यांचा दावा; सरकारच्या विकासकामांची लोकांकडून प्रशंसा

पाटणा : झारखंड विधानसभाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांत आपापसातील लाथाळ्यांमुळे भाजपपुढे कोणतेही आव्हान नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व झारखंडचे प्रभारी नंद किशोर यादव यांनी सांगितले. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे ते आत्मविश्वासाने म्हणाले. ८१ सदस्यांच्या विधानसभेत भाजप ६५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे सांगून यादव म्हणाले की, हे पक्ष भाजपपुढे आव्हान उभे करण्याऐवजी आपापसांतच भांडत आहेत. यादव म्हणाले की, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांनी आघाडी स्थापन केली आहे, तर झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) या आघाडीत लोकसभा निवडणुकीत सहभागी होता आता मात्र तो स्वतंत्रपणे लढत आहे. याशिवाय काही पक्ष असे आहेत की, त्यांच्यामुळे भाजपचे कमी; परंतु या विरोधकांचे जास्त नुकसान होणार आहे. नंद किशोर यादव हे बिहारमध्ये मंत्री आहेत.बिहारमध्येच केंद्रित असलेला जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष या निवडणुकीवर काही परिणाम घडवतील का, असे विचारले असता यादव म्हणाले की, या पक्षांचा मतदारांवर काहीही प्रभाव पडणार नाही.जनता दल (संयुक्त) आणि लोक जनशक्ती पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवीत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणि झारखंडमध्ये रघुबर दास यांच्या सरकारने जी विकासकामे केली आहेत, त्यांची लोकांनी प्रशंसा केली असून, हेच सरकार पुढेही राहावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे यादव यांनी सांगितले. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यात पाच टप्प्यांत ही निवडणूक होईल. २३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.जेडीयूचा रॉय यांना पाठिंबारांची : झारखंडचे माजी मंत्री सरयू रॉय यांना विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पाठिंबा देणार आहे, असे जेडीयूचे ज्येष्ठ नेते राजीव रंजन सिंह यांनी मंगळवारी येथे सांगितले. रॉय हे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत.जेडीयू झारखंडमध्ये स्वतंत्रपणे लढत असून, रॉय यांना पाठिंबा देण्यासाठी त्याने आपला जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून उमेदवारही मागे घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे रॉय यांचा प्रचार करतील का, असे विचारले असता सिंह यांनी रॉय यांनी तशी विनंती केली, तर असे उत्तर दिले.सिंह हे नितीश कुमार यांचे विश्वासू असून, लोकसभेत जेडीयूचे ते संसदीय नेते आहेत. नितीश कुमार यांच्याशी माझी असलेली जवळीक मला भाजपने तिकीट नाकारण्याचे एक कारण असू शकते, असे रॉय यांनी सोमवारी म्हटले होते.मतदारांसाठी हेल्पलाईनझारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी विनयकुमार चौबे यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना असे आवाहन केले आहे की, राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी म्हणजे ३० नोव्हेंबरपूर्वी वोटर स्लिप वितरित करण्यात याव्यात.याबाबतचा अहवाल सादर करण्यासही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, मतदारांसाठी १९५० ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्यांना व्होटर स्लिप मिळाली नाही आदी मुद्यांवर यातून मदत मिळेल.

टॅग्स :BJPभाजपा