शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
4
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
5
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
6
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
8
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
9
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
10
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
11
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
12
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
13
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
14
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
15
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
16
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
17
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
18
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
19
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
20
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा, विरोधकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 17:03 IST

BJP Flag Found Draped Around Gandhi Statue: माकपचे युवा युनिट डीवायएफआयने या घटनेविरोधात मोर्चा काढून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

ठळक मुद्देया घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बंगळुरु : केरळमध्ये जय श्री राम असे बॅनर लावल्याची घटना घडल्यानंतर सोमवारी पलक्कड येथील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा गुंडाळल्याचे निदर्शनास आले. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या झालेल्या प्रकाराबद्दल भाजपाने स्वत: ला दूर केले आहे. तर माकपचे युवा युनिट डीवायएफआयने या घटनेविरोधात मोर्चा काढून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. काँग्रेस आणि त्यांच्या युवा संघटनेनेही या विरोधात स्वतंत्र मोर्चा काढला. 

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या  सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती मास्क घालून पालिकेच्या इमारतीवर चढून गांधींच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा बांधताना आणि नंतर खाली उतरताना दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही अद्याप दोषींना ओळखू शकलो नाही. कारवाई चालू आहे. 

माकप आणि काँग्रेसकडून या घटनेचा निषेधडीवायएफआय, माकपच्या युवा संघटनेने निषेध मोर्चा काढून पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि त्याच्या युवा संघटनेनेही स्वतंत्र मोर्चा काढला. त्यानंतर माकप आणि काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी पालिका अध्यक्षांच्या दालनासमोर आंदोलन केले आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नाव न देण्याच्या अटीवर भाजपा नेत्यांनी सांगितले की, या घटनेत पक्ष सामील नाही. त्यांनी याबाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अखेर भाजपाच्या झेंड्यावर का गोंधळ उडाला?महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा लावल्यानंतर खळबळ उडण्याचे मुख्य कारण म्हणजे जय श्री रामचे बॅनर. केरळमध्ये डिसेंबर महिन्यात स्थानिक निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळविला आहे. नगर पालिकेत भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्सव साजरा करताना काही कार्यकर्ते पलक्कड नगरपालिका इमारतीवर चढले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पोस्टर लावले. दुसरीकडे, काही कार्यकर्त्यांनी त्यावर 'जय श्री राम' असे लिहिलेले बॅनर लावले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी