नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे मोठे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, हे आंदोलन आणि तिथे जमलेल्या आंदोलकांविरोधात काही जण रस्त्यावर उतरले असून, शाहीनबागमधील आंदोलकांना तिथून हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी या मंडळींकडून करण्यात येत आहे. गेल्या 50 दिवसांपासून शाहीनबाग येथे एनआरसी आणि सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आंदोलनामुळे येथील रस्ता बंद असल्याने स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या आंदोलकांविरोधात हे लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, आपण कुठल्याही पक्षाशी निगडीत नसल्याचा दावा या मंडळींकडून करण्यात येत आहे. मात्र यापैकी अनेक जण बजरंग आखाडा समिती, गोरक्षा, बजरंग दल या संघटनांशी संबंधित आहेत.
शाहीनबागमधील आंदोलनाविरोधात दिल्लीत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 14:53 IST