शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:21 IST

एका राजकीय पक्षाने आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली. याआधी याच विषयावर आंदोलनास परवानगी दिली होती.

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आंदोलनामुळे सामान्य नागरिकांच्या मुक्त वावराच्या हक्कावर परिणाम होत असेल आणि आंदोलनामुळे परिसरातील लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होत असेल तर त्याला परवानगी नाकारलीच पाहिजे म्हणत पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी आंदोलनास पोलिसांनी नाकारलेली परवानगी मद्रास हायकोर्टाने योग्य ठरवली. आंदोलने मजेसाठी नसतात, अशी टिप्पणीही कोर्टाने केली.

एका राजकीय पक्षाने आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली. याआधी याच विषयावर आंदोलनास परवानगी दिली होती. मात्र, पक्षप्रमुखांच्या सहभागास मनाई केली होती. दुसऱ्या अर्जामध्ये पक्षप्रमुखांच्या सहभागाचा  स्पष्ट उल्लेख केला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. इतर राजकीय पक्षांना परवानगी मिळाल्याचा पण त्यांना नाकारल्याचा दावा केला.

परवानगी नाकारणे का गरजेचे?पोलिसांनी उत्तरात पूर्वीच्या आंदोलनात काही वक्त्यांनी जातीय तेढ निर्माण करणारे, महिलांचा अवमान करणारे आणि भडकवणारे वक्तव्य केले होते. त्याच दिवशी मंदिराचा रथोत्सव असून तेथे बंदोबस्ताची गरज आहे. आंदोलनस्थळी आठवडी बाजार भरत असल्याने अडथळ्याची  शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या आंदोलनास परवानगी नाकारणे आवश्यक होते असे म्हटले. लोकशाहीत निदर्शनाचा अधिकार महत्त्वाचा असला तरी नागरी सुविधा, सामाजिक शांतता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊनच आंदोलनास परवानगी दिली पाहिजे म्हणत हायकोर्टाने याचिका फेटाळली.

संविधानातील कलम १९(१) (ब) अंतर्गत नागरिकांना शांततामय आंदोलनाचा अधिकार, “वाजवी निर्बंधांखालीच” असतो. रस्ते, वाहतूक, बाजारपेठा, धार्मिक समारंभ यावर परिणाम होणार असेल तर अशा आंदोलनास परवानगी नाकारणे योग्यच आहे.न्यायमूर्ती पुगलेन्थी

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय