शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्ववादी नेत्यांच्या भडक वक्तव्यांचा निषेध करावा; पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:54 IST

माजी लष्करी अधिकाऱ्यांसह १०० मान्यवरांची मागणी. भारतात हिंदू राज्य स्थापन करायचे असून, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा, हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा, अशी वक्तव्ये या नेत्यांनी केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हरिद्वार, दिल्ली व अन्य काही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत हिंदुत्ववादी नेत्यांनी मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणारी वक्तव्ये केली आहेत. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा भडक वक्तव्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करावा, तसेच दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे पत्र पाच माजी नौदल, हवाई दलप्रमुखांसह १०० मान्यवरांनी या दोघांना लिहिले आहे. 

हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये माजी नौदलप्रमुख ॲडमिरल एल. रामदास, ॲडमिरल विष्णू भागवत, ॲडमिरल अरुण प्रकाश, ॲडमिरल आर. के. धोवान, माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी तसेच माजी सनदी अधिकारी, पत्रकार, वकील, अर्थतज्ज्ञ यांचाही समावेश आहे. या पत्रात म्हटले आहे की, हरिद्वार येथे झालेल्या तीन दिवसीय धर्मसंसदेत हिंदुत्ववादी नेते व साधू-संतांनी जी प्रक्षोभक भाषणे केली, त्याचा आम्ही निषेध करतो. भारतात हिंदू राज्य स्थापन करायचे असून, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा, हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा, अशी वक्तव्ये या नेत्यांनी केली. म्यानमारप्रमाणे पोलीस, लष्कर व प्रत्येक हिंदूने हत्यारे बाळगावीत व एका समुदायाचा नरसंहार करावा, असे उद्गार हिंदू रक्षा सेनाचे स्वामी प्रबोधानंद यांनी धर्मसंसदेत केले होते.

बाह्यशक्तींच्या हाती कोलीत नकोया पत्रात म्हटले आहे की, देशाच्या सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. अशा स्थितीत देशात काही मंडळी करत असलेल्या भडक वक्तव्यांमुळे बाह्यशक्तींना हातात आयते कोलीत मिळू शकेल. पोलीस असो वा लष्कर त्यांच्यामध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेला चिथावणीखोर भाषणांमुळे तडा जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.  

टॅग्स :Hinduismहिंदुइझम