शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करणी सेनेचा ‘पद्मावत’ विरोध अखेर मावळला; राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:46 IST

राजपूत करणी सेनेने आपला ‘पद्मावत’ चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला असून, या चित्रपटात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आले आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.

मुंबई/जयपूर : राजपूत करणी सेनेने आपला ‘पद्मावत’ चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला असून, या चित्रपटात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आले आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.चित्रपटाविरोधात चित्रीकरणापासूनच करणी सेनेने आंदोलन सुरू करून, जयपूरमधील सेट जाळला होता. चित्रपटात अलाउद्दीन खिलजी व राणी पद्मावतीचा रोमान्स दाखविल्याचा सेनेने निषेध केला होता आणि चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. तशी दृश्ये चित्रपटात नसल्याचा निर्वाळा वारंवार देऊ नही सेनेने हिंसक आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करावे लागले होते. भाजपाशासित राज्यांनी ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. (वृत्तसंस्था)करणी सेनेचे नेते योगेंद्र सिंग कटार यांनी चित्रपटाविरोधातील आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामाडी यांच्या सूचनेनुसार काही सदस्यांनी ‘पद्मावत’ पाहिला. त्यात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. राजपूत समुदायाच्या भावना दुखावतील, असे कोणतेही दृश्य त्यात नाही.‘पद्मावत’ चित्रपटाला पहिला विरोध राजस्थानातच झाला. तो प्रदर्शित होऊ नये, असा प्रयत्न राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या सर्व भाजपाशासित राज्यांच्या सरकारांनी केला. त्यानंतर, गुजरातमधील मल्टिप्लेक्स मालकांनीच तो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. अखेर तीच संघटना हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.पराभवानंतर आंदोलन मागेराजस्थानातील दोन लोकसभा व एक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा नुकताच पराभव झाला आहे. भाजपाने ‘पद्मावत’ प्रकरणी राजपूत समाजाची फसवणूक केल्यामुळे आम्ही भाजपाला धडा शिकविला, असा दावा राजपूत समाजाच्या टिष्ट्वटर हँडलवरून काल करण्यात आला होता. भाजपाच्या पराभवाच्या दुसºयाच दिवशी करणी सेनेने ‘पद्मावत’ विरोधातील आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Padmavatपद्मावतcinemaसिनेमा