पर्यावरणवादी सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषणावर आहेत. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. बुधवारी केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. निदर्शकांची पोलिसांशी झटापट झाली, दगडफेक झाली आणि सीआरपीएफच्या एका वाहनालाही आग लावण्यात आली. निदर्शक भाजप कार्यालयाबाहेरही निदर्शने करत आहेत. वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लडाखची सर्वोच्च संस्था लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. लडाख बंद दरम्यान आज लेहमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
मागण्या काय आहेत?
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा.
लडाखचा समावेश संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये करावा.
लडाखसाठी दोन लोकसभेच्या जागांची मागणी करण्यात आली आहे.
लडाखमधील जमातींना आदिवासी दर्जा देण्यात यावा.जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ शांति ओम..."
वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या चार मागण्या आहेत. या कार्यक्रमादरम्यान एक रॅलीही काढण्यात आली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन भाग झाले. जम्मू आणि काश्मीर हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश बनला, तर लेह आणि कारगिल यांचा समावेश असलेला लडाख हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झाला. आता, याच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे.