शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

गौरी यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध, पत्रकारांचे मोर्चे; परदेशी वृत्तपत्रांनीही केला उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:05 IST

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशांतही निषेध होत असून, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या अग्रगण्य परदेशी वृत्तपत्रांनी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही या हत्येची दखल घेतली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशांतही निषेध होत असून, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या अग्रगण्य परदेशी वृत्तपत्रांनी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही या हत्येची दखल घेतली आहे. उजव्या विचारसरणीच्या विरोधात लिखाण करणा-या गौरी लंकेश यांची हत्या अशाच बातम्या या वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, दोनच दिवसांत गौरी लंकेंश यांची हत्या झाली, असाही उल्लेख सर्वांनी केला आहे.गौरी यांच्या हत्येचे पडसाद आज देशभर उमटले. सर्व राज्यांत आणि शहरांतील पत्रकार संघटनांनी या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे, मिरवणुका, मेणबत्ती मोर्चे, धरणे आदी आंदोलनांचे आयोजन केले होते. प्रेस क्लब आॅफ इंडिया आणि एडिटर्स गिल्ड यांनी हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील व लोकशाहीवरील हल्ला आहे, असे म्हटले आहे. भारतातील अमेरिकन दूतावासानेही या हत्येची निंदा केली आहे.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे निषेध केला. लंकेश यांच्या हत्येमुळे समाजात असहिष्णुता आणि फाजील धर्माभिमानाच्या क्रूर चेहºयाने पुन्हा डोके वर काढल्याची भयानक जाणीव झाल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लंकेश यांच्या हत्येचा धक्का बसल्याचे व सत्य कोणीही दडपू शकत नसल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा सत्य दडपू पाहात आहेत, परंतु ते भारतात शक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही या हत्येचा निषेध केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असून, लोकशाहीचा गळा आवळला जात आहे आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य व्हेंटिलेटरवर आहे, असे सिंघवी म्हणाले.डाव्यांची टीका-गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे मौन आश्चर्यकारक आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले. या हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मवेड्या शक्ती आहेत, असा आरोप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी येथे केला.भाजपाची मागणी-हत्या करणाºयांना सरकारने तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीका करून, केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती वाईट झाली आहे.एम. एम. कलबुर्गी यांच्याहत्येशिवाय १८-१९ राजकीय हत्या झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशMurderखूनCrimeगुन्हा