शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

धूम्रपानाचा विरोध बेतला जिवावर, 21 वर्षीय विद्यार्थ्याची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 20:34 IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे.  धूम्रपाण करण्यापासून रोखणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे

नवी दिल्ली, दि. 21 :  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, अनेक नागरिक याचे उल्लंघन करताना दिसून येते. याचा इतर नागरिकांना त्रास होतो, याची त्यांना जराही जाणीव नसते. राजधानी नवी दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे.  धूम्रपाण करण्यापासून रोखणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्या तरुणाचे नाव गुरप्रीत असे आहे. 

राजधानी दिल्लीमध्ये गुरप्रीत फोटोग्राफीचा विद्यार्थी आहे. गुरप्रीत सिंग आणि त्याचा 22 वर्षीय मित्र मणिंदर सिंग रात्रीच्या वेळी डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगसाठी निघाले होते. रात्री एकच्या सुमारास सफदरजंग हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेलपाशी ते थांबले होते. त्यावेळी आरोपी रोहित कृष्ण महंत त्यांच्याजवळ उभा राहून धूम्रपान करायला लागला. सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करत असल्याने दोघांनी त्याला हटकलं. संतापलेल्या आरोपीने गुरप्रीत आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली आणि तिघांमध्ये बाचाबाची झाली. इतरांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोघं जण त्यांच्या बाईकवरुन निघून गेले.

रोहितच्या मनात मात्र राग धुमसत होता. त्याने आपल्या गाडीने दोघांच्या बाईकचा पाठलाग केला. दोघांनी जेमतेम 400 मीटर अंतर पार केलं असेल, त्याचवेळी रोहितच्या कारने बाईक जोरदार धडक दिली. कारखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या गुरप्रीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मणिंदरवर उपचार सुरु आहेत.