शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना चौकशीपासून संरक्षण; माेदी सरकारने काढले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 07:50 IST

खासदार व आमदारांनाही सुरक्षा

- हरीश गुप्तानवी दिल्ली: सनदी अधिकारी आणि उच्चाधिकाऱ्यांचा भविष्यात छळ हाेऊ नये, यासाठी माेदी सरकारने संरक्षण दिले आहे. काेणाची चाैकशी काेणत्या दर्जाचा अधिकारी करेल, याबाबत सरकारने नियमावली जारी केली आहे. केवळ अधिकारीच नव्हे तर सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार, मुख्यमंत्री, आमदार तसेच सार्वजनिक कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना माेदी सरकारने एक आदेश काढून  अभूतपूर्व संरक्षण दिले आहे. 

विकास मार्गावर निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आराेपांची चाैकशी पाेलीस महासंचालक किंवा समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांनीच करावी, असे या आदेशात  आहे. 

यामुळे काढले आदेश

सरकारी बाबूंमध्ये सीबीआय, सीव्हीसी यासारख्या तपास यंत्रणांसह राज्य सरकारच्या चाैकशांमुळे भीती निर्माण झाली आहे. त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा, यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे.  हे अधिकारी स्वत: निर्णय घेत नाहीत. आपापल्या विभागातील राजकीय साहेबांचे ते आदेश घेत असतात. मात्र, त्यांचा सेवेत असताना किंवा निवृत्तीनंतर चाैकशीच्या नावाखाली छळ हाेताे.

अकारण त्रास टाळण्याचा हेतू 

केंद्र सरकारने केलेल्या विभागणीनुसार, १४ आणि १५ व्या श्रेणीतील सरकारी अधिकारी तसेच सार्वजनिक कंपन्यांच्या संचालकांची चाैकशी अतिरिक्त पाेलीस महासंचालक दर्जाचा अधिकारीच करु शकेल.  मंत्री, खासदार, आमदार, सरकारी अधिकाऱ्यांविराेधातील तक्रारींची चाैकशी सुरू हाेते. मात्र, अनेकदा दाेष नसतानाही अधिकाऱ्यांना चाैकशीमुळे त्रास हाेताे. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न माेदी सरकारने केला आहे.

अनेकांचे पंख छाटले

प्रत्येक पदासाठी विभागणी केल्यामुळे पाेलीस निरीक्षकांसारख्या अधिकाऱ्यांचे पंख छाटले आहेत. एखाद्या प्रकरणात त्यांना थेट चाैकशी करता येणार नाही.

पदांनुसार चौकशीसाठी विभागणी 

सर्व राज्ये आणि तपास यंत्रणांनी याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश माेदी सरकारने दिले आहेत. या आदेशामध्ये सरकारने ‘एसओपी’ जारी केली आहे. वेगवेगळ्या पदावरील अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदावरील पाेलीस अधिकारी चाैकशी करतील, असे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार