नवी दिल्ली : ‘वेश्या व्यवसाय हा बलात्कारासमान आहे’ या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांच्या विधानावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. वेश्यांचे राष्ट्रीय संघटन (द नॅशनल नेटवर्क आॅफ सेक्स वर्कर्स ) आणि महिला संघटनांनी या विधानाचा तीव्र निषेध नोंदविला आहे. मलिवाल यांनी हे विधान तातडीने मागे घ्यावे आणि या व्यवसायातील महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा पोहोचविणाऱ्या या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, वेश्या व्यवसायातील महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची हमी देण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केली आहे. घटनेच्या २१ व्या कलमानुसार या महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठीच्या पर्याप्त परिस्थितीच्या अभ्यासासाठी न्यायालयाने स्वतंत्र गटाची निर्मिती केली आहे.दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा मात्र प्रौढांमधील परस्पर संमतीने होणारे लैंगिक संबंध व वेश्या व्यवसायातील ऐच्छिकतेची अकारण चर्चा छेडत आहेत. असले वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी पुरेसा अभ्यास करण्याची गरज आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वेश्या व्यवसाय बलात्कारासमान
By admin | Updated: August 5, 2015 23:17 IST