शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सेवा व केडर निवडीचे निकष बदलण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:37 IST

पीएमओचा आग्रह: परीक्षा व प्रशिक्षणावर ठरणार गुणवत्ता

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी)घेतली जाणारी केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची विभागणी विविध नागरी सेवांमध्ये आणि कॅडरमध्ये करण्याचे प्रचलित नियम बदलण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने केला आहे. हा प्रस्ताव अंमलात आला तर परीक्षेतील उत्तम रँक हा मनाजोगती सेवा व केडर मिळण्याचा एकमेव आणि खात्रीशीर मार्ग असणार नाही.पुस्तकी ज्ञानाच्या आधारे घेतल्या जाणाºया स्पर्धा परीक्षेतील गुणांसोबतच नंतरच्या प्रशिक्षणातील कामगिरी यांचा एकत्रित विचार करून सेवा व केडर ठरविण्याचा सरकारचा विचार आहे.प्रचलित नियमांनुसार नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाºया उमेदवारांचा गुणवत्ताक्रम व पसंती यानुसार त्यांची विभागणी भारतीय प्रसासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) व भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) यासह इतर सेवांमध्ये व राज्यनिहाय कॅडरमध्ये केली जाते. निवड झालेल्या सर्वांनाच मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. तेथे सर्वांसाठी सामायिक असा १५ आठवड्यांचा एक पायाभूत अभ्यासक्रम (फौंडेशन कोर्स) असतो. तो झाल्यावर उमेदवारांचे वर्गीकरण करून त्यांना सेवानिहाय प्रशिक्षण दिले जाते.म्हणजेच सध्या प्रशिक्षणाला जाण्याआधीच उमेदवाराची सेवा व केडर यांची निवड झालेली असते. आता पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) यात असा बदल प्रस्तावित केला आहे की, स्पर्धा परीक्षेतील रँक व फौंडेशन कोर्समधील कामगिरी यांचा एकत्रिक विचार करून उमेदवारांचे गुणांकन केले जावे व त्यानुसार त्यांना कोणत्या सेवेत व कोणत्या केडरमध्ये टाकायचे ते ठरविले जावे. कार्मिक मंत्रालयातील संयुक्त सचिव विजय कुमार सिंग यांनी कॅटर नियंत्रण करणाºया सर्व मंत्रालयांना ‘पीएमओ’चा हा प्रस्ताव पत्राव्दारे कळविला आहे. हे बदल यंदाच्या वर्षापासूनच लागू व्हावेत, असे ‘पीएमओ’ला वाटत असल्याने विविध मंत्रालयांकडून त्यावर एक आठवड्यात तातडीने मते व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.प्रस्तावातील ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा असावा. वर्षभरात दोन परीक्षा घेतल्या जाव्यात, विद्यमान व्यवस्थेशी निगडित परीक्षा किमान ३00 मार्कांची असावी. निवडलेल्या अधिकाºयांना अधिक काळ भारताच्या ग्रामीण भागांत व्यतित करावा. सरकारी मालकीच्या कंपन्या व उद्योगांच्या तपशिलांसह महत्त्वाकांक्षी सरकारी योजनांचे व्यावहारिक ज्ञान प्रशिक्षण काळात उमेदवारांनी आत्मसात करावे. फौंडेशन अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून विद्यमान विषयांवर अधिक प्रकाशझोत टाकणाºया विषयांचा त्यात समावेश करण्यात यावा. हे तर सेवांचे भगवेकरण पंतप्रधान कार्यालयाने प्रस्तावित केलेल्या या बदलांना काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला. रा. स्व. संघाच्या इशाºयावरून नागरी सेवांची निष्पक्षता नष्ट करून त्यांचे भगवेकरण करण्याचा हा कुटील डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला व काँग्रेस यास कसून विरोध करेल, असे सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा