शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:32 IST

Central Govt Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी आणीबाणीतील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले.

Central Govt Cabinet Meeting: देशातील आणीबाणी लावल्याच्या घटनेला ५० वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा सर्व देशभरात या आणीबाणीला विरोध दर्शवत काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे. यातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आणीबाणीविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. तसेच दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. 

आणीबाणीला ५० वर्षे झाल्यानिमित्त केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, या ठरावात १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीचे वर्णन 'लोकशाहीची हत्या' असे करण्यात आले आणि त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. २०२५ मध्ये आणीबाणीला ५० वर्षे झाल्यानिमित्त, लोकशाहीचे आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचा पुनरुच्चार करत हा ठराव मंजूर करण्यात आला, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

अनेक निष्पाप लोकांना अत्याचारांना सामोरे जावे लागले

प्रस्तावात म्हटले आहे की, आणीबाणीपूर्वी आणि दरम्यानच्या काळात देशभरात लोकशाही मूल्यांचे उल्लंघन झाले. नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले गेले. अनेक निष्पाप लोकांना अत्याचारांना सामोरे जावे लागले. विद्यमान मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी आणीबाणीतील बळींना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले.

दरम्यान, आणीबाणीच्या काळात मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा हिरावून घेण्यात आल्याचा दावा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना लोकशाही सैनिक म्हटले आहे. मंत्रिमंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनाही या लोकशाही सैनिकांकडून शिकण्याचे आवाहन केले आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एक निवेदन जारी करण्यात आले.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार