शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हा घ्या विरूष्काच्या लग्नाचा पुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 13:12 IST

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे.विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे. विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. गुरूवारी रात्री उशिरा अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या कुटुंबीयांबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसली. शर्मा कुटुंबीय इटलीला जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. इटलीला विरूष्का डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांनी लग्नाची बातमी मीडियापासून दूर ठेवली असली तर काही माहिती हळूहळू समोर येते आहे. विरूष्काच्या लग्नाचं निमंत्रण अनुष्काच्या काही शेजाऱ्यांना मिळाल्याचं समजतं आहे. वर्सोवामधील बद्रीनाथ टॉवरमध्ये अनुष्का शर्मा राहते. त्या इमारतीमधील काही जवळच्या लोकांना आमंत्रण दिल्याचं वृत्त 'मीड डे'ने दिलं आहे. अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा यांनी स्वतः काही शेजाऱ्यांना फोन करून लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, अनुष्काच्या वडिलांनी इमारतीत राहणाऱ्या काही जवळच्या लोकांना फोन करून पुढील आठवड्यात होणाऱ्या लग्नाचं निमंत्रण दिलं. लग्न इटलीला असल्याने प्रत्येक जण इटलीला येऊ शकत नाही, म्हणून नवं दाम्पत्याला आशिर्वाद देण्याची विनंती अनुष्काच्या वडिलांनी केली आहे. विरूष्काच्या लग्नाबद्दलची मीडियामध्ये असलेली चर्चा लक्षात घेता ज्या शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं त्यांना ही गोष्ट गुप्त ठेवण्याच सांगितलं आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी खासगी कारण देऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या या निर्णयानंतर विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी अनुष्काच्या घरी गेले होते. त्यानंतर सब्यासाची अनुष्काच्या लग्नाचा ड्रेस डिझाईन करणार असल्याची चर्चा सुरू झाली. विराटचे क्रिकेट गुरू राजकुमार शर्मा यांनी सुट्टीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Virushka Weddingविरूष्का वेडिंगVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माItalyइटलीVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्न